Home देश cabinet takes three big decisions: शेतकऱ्यांपासून ते उद्योगापर्यंत; केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतले ६...

cabinet takes three big decisions: शेतकऱ्यांपासून ते उद्योगापर्यंत; केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतले ६ मोठे निर्णय – modi cabinet decisions cabinet takes six big decisions see important points


नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाने आज ‘स्वावलंबी भारत’ पॅकेज अंतर्गत शेती आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणांवर शिक्कामोर्तब केले. ही माहिती देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या कक्षेतून अनेक कृषी उत्पादने वगळण्याच्या घोषणेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी तीन मोठे निर्णय घेण्यात आले. तसेच देशातील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून आणखी दोन निर्णय स्वतंत्रपणे घेण्यात आले आहेत, अशी माहितीही जावडेकर यांनी दिली.

जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या तलवारीने गुंतवणुकीला रोखण्याचे काम केले. आज धान्य, तेल, तेलबिया, मसूर, कांदे, बटाटे यासारख्या जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आल्या आहेत. आता शेतकरी योजनेनुसार त्या साठवून विकू शकतो. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असे जावडेकर म्हणाले.शेतकऱ्यांची ही मागणी ५० वर्षांपासूनची होती. आज ही मागणी पूर्ण झाली असल्यातेही ते पुढे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या सर्व निर्णयांची त्यांनी टप्प्याटप्प्याने माहिती दिली. आज मंत्रिमंडळाने एकूण सहा मोठे निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयांबाबत माहिती देताना ते म्हणाले की,

पहिला निर्णय– शेतकरी आपले उत्पादन कोठेही विकू शकेल आणि जास्तीचे पैसे देणाऱ्यांना त्या वस्तू विकण्याचे स्वातंत्र्य त्याला मिळाले आहे.

दुसरा निर्णय म्हणजे, भारत वन नेशन, वन मार्केटच्या दिशेने पुढे वाटचाल करेल. त्यासाठी कायदा केला जाईल.

तिसरा निर्णय हा अधिकच्या किंमतीची हमी देण्याचा निर्णय. कोणी निर्यातदार असेल तर कुणी प्रोसेसर असेल, कोणी इतर पदार्थांचे उत्पादक असतील, अशांना परस्पर करारानुसार शेतीमाल विक्री करण्याची परवानगी आहे. यामुळे पुरवठा साखळी तयार होईल. भारतात प्रथमच असे पाऊल उचलले गेले आहे.

चौथा निर्णय वाणिज्य आणि उद्योगासाठी घेण्यात आला आहे. प्रत्येक मंत्रालयात एक प्रकल्प विकास कक्ष असेल. यामुळे गुंतवणूकदारांसाठी भारत अधिक आकर्षक व अनुकूल देश होईल.

पाचवा निर्णय हा कोलकाता बंदराला श्यामा प्रसाद मुखर्जी असे नाव देण्याबाबतचा आहे. नाव देण्याचा हा निर्णय मंत्रिमंडळाने आज घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ जानेवारी रोजी याची घोषणा केली होती.

सहावा निर्णय , फार्मोकॉपिया कमिशन स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फार्माकॉपिया कमिशन होमिओपॅथी आणि इंडियन मेडिसिन असेल. गाझियाबादमध्ये आयुष मंत्रालयाच्या दोन लॅब आहेत. या दोन्ही लॅब देखील यात विलीन होत आहेत.

तीन दिवसांतील केंद्रीय मंत्रिमंडळाची ही दुसरी बैठक

या आठवड्यातील केंद्रीय मंत्रिमंडळाची ही दुसरी बैठक होती. यापूर्वी सोमवारी एक बैठक घेण्यात आली होती. ही बैठक मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिली मंत्रिमंडळ बैठक होती. त्या बैठकीत शेतकरी, एमएसएमई क्षेत्र आणि फेरीवाले, हातावर पोट असणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kitab-i-Nauras book: सांगीतिक मूल्यांचा ऐतिहासिक ग्रंथ – dr balasaheb labade book review on kitab-i-nauras book

डॉ. बाळासाहेब लबडे'किताबे नवरस' हा मूळ विजापूरचा सुलतान इब्राहीम आदिलशहा दुसरा याने दखनी भाषेत लिहिलेला ग्रंथ. या ग्रंथाचा डॉ. सय्यद याह्या नशीत यांनी...

फोटो काढण्याच्या नादात महिलेने गमावला जीव

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वरजवळील हरिहर किल्ल्यावर कुटुंबीयांसह फिरायला आलेल्या महिलेचा किल्ला चढतेवेळी फोटो काढताना पाय घसरून दगडावर पडल्यने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी...

India vs Australia: ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला झाला दंड; केली ही चूक! – india tour of australia 2020 india vs australia team india fined for...

सिडनी: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला पहिल्यास सामन्यात पराभव स्विकारावा लागला. सिडनी क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६६ धावांनी पराभव केला आणि...

Recent Comments