Home विदेश cafe denies entry to pm: चक्क पंतप्रधानांनाच रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला! - new...

cafe denies entry to pm: चक्क पंतप्रधानांनाच रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला! – new zealand cafe denies entry to its pm to ensure social distancing


वेलिंग्टन: आपल्या कॅफेटेरिया, रेस्टोरंटमध्ये देशाच्या सर्वोच्च नेते मंडळी, व्हीआयपींनी हजेरी लावावी यासाठी अनेकजण उत्सुक असतात. त्यांच्यासाठी पायघड्याही घातल्या जातात. मात्र, एका रेस्टॉरंटमध्ये चक्क पंतप्रधानांना प्रवेश नाकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांना राजधानी वेलिंग्टनमधील एका रेस्टॉरंटमध्ये शनिवारी प्रवेश नाकारण्यात आला.

न्यूझीलंडमध्ये लॉकडाउनचे निर्बंध काहीसे शिथिल करण्यात आल्यानंतर काही नियमांसह रेस्टॉरंट सुरू करण्यात आली आहेत. रेस्टॉरंटमध्ये सुरक्षित वावराच्या नियमांचे पालन करण्यात येत असून, दोन व्यक्तींमध्ये एक मीटरचे अंतर राखणे आवश्यक आहे. त्यानुसार अनेक रेस्टॉरंटमधील आसनव्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. पंतप्रधान अर्डर्न आणि त्यांचे प्रियकर क्लार्क गेफोर्ड ‘ऑलिव्ह’ रेस्टॉरंटमध्ये न्याहरीसाठी गेले होते. मात्र, रेस्टॉरंटमध्ये जागा नसल्याने त्यांना आत सोडण्यात आले नाही. पंतप्रधानांनी रेस्टॉरंटजवळ सर्वांप्रमाणेच प्रतीक्षा केली, असे त्यांच्या कार्यालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

वाचा: करोना: ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या चाचणीला मोठं यश!

न्यूझीलंडमध्ये लॉकडाउनच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यावर कारवाई केली होती. करोनावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झालेल्या मोजक्या देशांमध्ये न्यूझीलंडचा समावेश होतो. न्यूझीलंडमध्ये १४९९ जणांना करोनाची बाधा झाली असल्याची नोंद असून २१ जणांचा मृत्यू झाला. तर, १४३३ जणांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून सध्या ४५ जण उपचार घेत आहेत.

आणखी वाचा:
करोना संसर्गाचा मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम!
अमेरिकेने चीनवर कारवाई करावी; १८ कलमी प्रस्ताव सादर!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

जाता जाता : या, बसा डोक्यावर…

परवा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिंकलेल्या आपल्या नवऱ्याला डोक्यावर घेऊन निघालेल्या एक उत्साही वैनी बघितल्या आणि जीव धन्य जाहला... हल्ली व्हॉट्सअप विद्यापीठामुळं जगभरातल्या अशा मनमौजेच्या...

coronavirus vaccine updates: करोना लसीकरण: जगाला मिळणार दिलासा; अमेरिका घेणार ‘हा’ निर्णय – coronavirus vaccine news america will join the global corona virus vaccine...

जिनिव्हा: जगभरात करोनाचे थैमान सुरू असून अनेक देशांमध्ये लसीकरणही सुरू झाले आहे. करोनाच्या वाढत्या थैमानाचा सामना करणाऱ्या जगातील गरीब, विकसनशील देशांना मोठा दिलासा...

coronavirus update in maharashtra: महाराष्ट्राने ओलांडला २० लाखांचा टप्पा; मात्र, ‘हा’ दिलासा कायम – maharashtra crosses 20 lakh covid-19 caseload mark with 2,886 new...

मुंबईः गेल्या नऊ महिन्यांपासून करोनाचे संसर्गाचे संकट झेलत असलेल्या महाराष्ट्रातही अजूनही काही प्रमाणात करोनाचा धोका कायम असल्याचं चित्र आहे. राज्यातील करोना बाधित रुग्णांच्या...

Recent Comments