हायलाइट्स:
- कर्ज विनाअडथळा ग्राहकांना मिळावी यासाठी कॅनरा बँकेचे कर्ज मेळावे
- मुंबई आणि ठाण्यात एकाच दिवशी तीन कर्ज मेळावे
- या मेळाव्यात एकूण २२४ कोटींचे कर्ज वाटप
मुंबई : सावर्जनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने नुकताच मुंबईत कर्ज मेळाव्याचे आयोजन केले होत. बँकेने मुंबई आणि ठाण्यात तीन कर्ज मेळावे घेतले. या मेळाव्यात २२४ कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आल्याचे बँकेने म्हटलं आहे.
पेट्रोल-डिझेल महागले ; दोन दिवस विश्रांतीनंतर आज पुन्हा इंधन दरवाढीचा भडका
कॅनरा बँकेतर्फे सांताक्रुझ, दक्षिण मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर व ठाणे येथील सेलिब्रेशन बँक्वेट हॉल येथे मेगा रिटेल एक्स्पोचे एकाच दिवशी आयोजन करण्यात आले होते. या एक्स्पोमध्ये मुंबई आणि आसपासचे आघाडीचे बिल्डर्स आणि विकासक, महत्त्वपूर्ण ऑटोमोबाईल वितरक, आघाडीच्या शिक्षण संस्था सहभागी झाल्या होत्या. त्याचबरोबर बँकेकडून किरकोळ ग्राहकांसाठी यात सेवा देण्यात आली.
पुन्हा लॉकडाउनचे संकट ; दोन दिवसात सोनं ७५० रुपयांनी महागले , जाणून घ्या आजचा दरया कर्ज मेळाव्याला बँकेच्या मुख्य कार्यालयातील रीटैल ऐसेट आणि मार्केटिंग प्रमुख आर. पी जयस्वाल, मुंबई सर्कलचे चीफ जनरल मॅनेजर पी. संतोष, रिजनल ऑफिस-१ चे डेप्युटी जनरल मॅनेजर मनोज कुमार दास, डेप्युटी जनरल मॅनेजर रिजनल ऑफिस २ प्रवीण काबरा आणि ठाणे रिजनल ऑफिस च्या डेप्युटी जनरल मॅनेजर के.बी गीता व अन्य मान्यवरांचा समावेश होता.
मुकेश अंबानींना सुप्रीम कोर्टाचा दणका; कोर्टाच्या ‘या’ निर्णयाने वाढणार अडचणी
या एक्स्पो मध्ये सर्व मान्यवरांनी ग्राहकांशी संवाद साधला आणि एक्स्पो मधील सर्व स्टॉल्सना भेट दिली. एक्स्पो मध्ये उपस्थित असलेल्या रिटेलर्स नी त्यांच्या स्टॉलवर त्यांची विविध उत्पादने प्रदर्शित केली होती. आज आयोजित करण्यात आलेल्या या एक्स्पो मध्ये २२४.३० कोटीच्या कर्जांचे वाटप करण्यात आले.
या एक्स्पो बरोबरच कॅनरा बँकेने नानावटी हॉस्पिटलच्या सहकार्याने एक्स्पोला भेट देणार्या लोकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणीचेही आयोजन केले होते. या एक्स्पोच्या दरम्यान बँकेकडून कोविड-१९ साठी आवश्यक सर्व नियमावलीचे पालन करण्यात आले, यामध्ये प्रवेश करतांना थर्मल स्कॅनिंग करणे, मास्क आणि सॅनिटायझेशन स्टेशन्स, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे तसेच थोड्या लोकांना प्रवेश देणे इत्यादींचा समावेश आहे.