Home आपलं जग करियर career news News: गेम डिझायनिंगची आवड - interest in game designing

career news News: गेम डिझायनिंगची आवड – interest in game designing


स्वाती साळुंखे

Growth.swati@gmail.com

० माझ्या मुलानं यंदा दहावीची परीक्षा दिली. त्याचा गेम डिझायनिंगकडे कल आहे. त्या दृष्टीनं आम्हाला मार्गदर्शन करा.

– आशा पाटील

तुमच्या मुलाचा गेम डिझायनिंगमध्ये कल आहे तर त्यानुसार त्याच्याकडे खालीलप्रमाणे करिअरचे पर्याय उपलब्ध आहेत…

पर्याय १- दहावीनंतर कोणतीही शाखा निवडा. पदवी अभ्यासक्रम पूर्ण करताना गणित विषय घ्या. त्याचबरोबर सॉफ्टवेअर संबंधित विविध सर्टीफिकेट कोर्स करा.

पर्याय २- सायन्स शाखा निवडून पीसीएमचा अभ्यास करा. इंजिनीअरिंगसाठी आवश्यक असणाऱ्या प्रवेश परीक्षा द्या. आयटी किंवा कम्प्युटर इंजिनीअरिंगचं शिक्षण घ्या. त्यासोबत सॉफ्टवेअर संबंधित ऑनलाइन उपलब्ध असलेले विविध कोर्स करा.

पर्याय ३- कोणत्याही शाखेची निवड करुन डिझायनिंगचे कोर्स करा किंवा काही मोजक्या विद्यापीठांमध्ये गेम डिझायनिंगचे कोर्स उपलब्ध आहेत, त्याचा विचार करु शकता.

पर्याय ४- दहावीनंतर कम्प्युटर संबंधित डिप्लोपा कोर्स पूर्ण करु शकतो आणि त्यानंतर गेम डिझायनिंग संदर्भातील पदवी अभ्यासक्रम पूर्ण करु शकतो.

० मी बारावी सायन्स शाखेची (बायफोकल) विद्यार्थिनी आहे. तर मी शेफ होऊ शकते का? त्याशिवाय विविध क्षेत्रांची माहिती द्या.

– हर्षिका म्हस्के

तुम्ही शेफ होऊ शकता. त्यासंबंधी प्रवेश परीक्षा आणि प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. करिअरची अनेक क्षेत्र उपलब्ध आहेत. तुम्हाला कोणत्या क्षेत्रांमध्ये रस आहे हे कळल्यास मार्गदर्शन करणं सोपं होईल.

० मी बायोटेक्नॉलॉजीमध्ये बीएस्सी केलं आहे. रेडिओलॉजीचा पोस्टग्रॅज्युएट कोर्सही केला आहे. मला न्यूक्लीअर मेडिसीनमध्ये मास्टर्स/ इंटिग्रेटेड मास्टर्स/ पीएचडी करायची इच्छा आहे किंवा परदेशातून आँकोलॉजी करायचा विचार आहे. पण यासाठी मला शिष्यवृत्ती उपलब्ध होत नाही. हा कोर्स कोणत्या देशातून करता येईल किंवा यासंदर्भात माहिती देणारी वेबसाइट तुम्ही सुचवू शकाल का?

– सचिन जाधव

परदेश ही एक व्यापक संकल्पना आहे. तुम्हाला आँकोलॉजी कोर्स नेमका कोणत्या देशातून करायचा आहे, याची काहीच कल्पना तुम्ही येथे दिलेली नाही. सर्रास मार्गदर्शन करणं तुमच्या बाबतीत शक्य नसल्यानं अब्रॉड काऊन्सिलरची (परदेशातील शिक्षण विषयक मार्गदर्शक) भेट घेणं तुमच्यासाठी योग्य ठरेल. शिष्यवृत्ती हासुद्धा असाच आणखी एकव्यक्तिनिष्ठ मुद्दा आहे. प्रत्येक विद्यार्थी, विद्यापीठ, कोर्स आणि देश यानुसार शिष्यवृत्ती योजना, पात्रता निकष आदी गोष्टी बदलत असतात.

० मी बारावी सायन्स शाखेचा विद्यार्थी आहे. तर मी शेफचा कोर्स करण्यासाठी पात्र आहे का? कृपया मला मार्गदर्शन करा.

– अद्वैत कामत

हो, नक्कीच तुम्ही हा कोर्स करण्यासाठी पात्र आहात. एक लक्षात घ्या, की काही कोर्स करण्यासाठी दहावी पास ही शैक्षणिक पात्रता पुरेशी ठरते तर काही कोर्सेसला प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही शाखेतून बारावी पास असणं आवश्यक आहे. या कोर्सेसचा कालावधी साधारण एक ते तीन वर्ष असतो. त्यामुळे कोर्सला प्रवेश घेण्याचे पात्रता निकष हे प्रत्येक कोर्सच्या कालावधीप्रमाणे वेगवेगळे असतात. त्याचबरोबर तत्सम विषयाचं प्रशिक्षण देणारे सर्टीफिकेट/डिप्लोमा तसंच बॅचलर डिग्री कोर्स या प्रकारात उपलब्ध असतात. त्यामुळे आपल्याला नेमका कोणता कोर्स करायचा आहे, याबद्दलचा तुमचा विचार पक्का झाला की मग पुढची वाटचाल तुम्हाला ठरवता येईल. करिअरसाठी तुमच्याकडे अनेक क्षेत्रांचे पर्याय असू शकतात, पण केवळ त्यात रुची आहे किंवा तुम्हाला अमूक एखादं क्षेत्र आवडतं हा एवढाच निकष त्यासाठी असू शकत नाही. तुमच्या भविष्याच्या दृष्टीनं तुम्ही एखाद्या व्यावसायिक काऊन्सिलरची मदत आणि मार्गदर्शन घेतल्यास पुढील योजना आखणं तुम्हाला शक्य होईल.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

shaheen afridi: ‘या’ गोलंदाजाने भारताच्या जसप्रीत बुमराहचा विक्रम मागे टाकला – pakistan shaheen afridi became quickest 100 wickets in t20

नवी दिल्ली: भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह(jasprit bumrah)चा टी-२० मधील विक्रम पाकिस्तानच्या एका गोलंदाजाने मागे टाकलाय. २०१८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहीन...

Recent Comments