Home आपलं जग करियर career news News : पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द; जीआर निघाला - final...

career news News : पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द; जीआर निघाला – final year exams scrapped by maharashtra government announced by higher education minister


कृषी विदयापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्रांच्या परीक्षांसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षाही घेणे शक्य नसल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज जाहीर केले. पदवी परीक्षा रद्द झाल्या आहेत, या निर्णयावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. यासंदर्भातील शासन आदेश जारी झाला आहे, अशी माहितीही सामंत यांनी दिली. ते फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.

सामंत म्हणाले, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केल्यानंतरही राज्यात संभ्रमाचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत पदवी परीक्षांबाबतचेच विषय अजेंड्यावर होते.’

जीआर मध्ये काय म्हटले आहे?

१) मागील सर्व सत्रांत जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशा अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना अंतिम सत्राच्या परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असल्यास तसे त्यांच्याकडून लेखी स्वरुपात घेऊन विद्यापीठाने योग्य ते सूत्र वापरून त्यांचा निकाल घोषित करावा.

२) ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची इच्छा असेल त्यांनी तसे विद्यापीठाला लेखी स्वरुपात द्यावे. त्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठांकडून येत्या काही दिवसात जाहीर करण्यात येईल. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सर्व ती आवश्यक खबरदारी घेऊन या परीक्षा होतील.

३) ज्या विद्यार्थ्यांना एटीकेटी आहे, त्यांच्या बॅकलॉग विषयांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठांचे कुलगुरू व संबंधित अधिकारी यांची शासनस्तरावर बैठक घेऊन त्यात विचारविनिमय होऊन निर्णय घेण्यात येईल.

४) व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेता येणार नाहीत. तशी विनंती प्रत्येक व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिखर संस्थेकडे करण्यात येणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे कोणते अभ्यासक्रम – अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, व्यवस्थापन शास्त्र, वास्तुकला, प्लॅनिंग, संगणकशास्त्र, विधी, शारीरिक शिक्षण, अध्यापन शास्त्र.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

bjp vs ncp clash in sangli: BJP vs NCP: सांगलीत भाजप-राष्ट्रवादीचं जीवघेणं राजकारण; ग्रामपंचायतीच्या दारात सदस्याचा बळी – clashes between bjp and ncp in...

हायलाइट्स:उपसरपंच निवडीवरून भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत हाणामारीमारहाणीत राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू.कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथील धक्कादायक घटना.सांगली:सांगली जिल्ह्यातील बोरगाव येथे उपसरपंच निवडीच्या वादातून भाजप...

Recent Comments