Home आपलं जग करियर career news News : पहिल्याच प्रयत्नात आयएस - is on the first...

career news News : पहिल्याच प्रयत्नात आयएस – is on the first try


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) च्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये जिल्ह्यातील बेज (ता. कळवण) येथील नवजीवन विजय पवार या युवकाने घवघवीत यश मिळवित जिल्हाधिकारी पदास गवसणी घातली आहे. गेल्याच आठवड्यात नवजीवन यांनी मध्य प्रदेशमधील श्योपूर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारत करोना विरोधातील लढ्यात धडाकेबाज कामगिरीही सुरू केली आहे.

नवजीवन मराठा विद्या प्रसारक समाजाचे माजी उपसभापती विजय पवार यांचे चिरंजीव आहेत. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी त्यांनी हे यश मिळविले आहे. नवजीवन यांचे प्राथमिक शिक्षण शहरातील निर्मला कॉन्व्हेंट येथे झाल्यानंतर पुढील शिक्षण महाबळेश्वर व इंजिनीअरिंगच्या पदवीचे शिक्षण पुणे शहरात झाले होते. पुण्यातील सीओईपी अभियांत्रिकी महाविद्यालयातून नवजीवन याने गेल्या वर्षी सिव्हील शाखेतील पदवी संपादन केल्यानंतर आयएएस बनण्याच्या ध्येयाने घरी न येता थेट दिल्ली गाठत नव्या प्रवासाला सुरुवात केली. अवघ्या वर्षभरात नियोजपूर्वक अभ्यास करीत पहिल्याच प्रयत्नात युपीएससीच्या निकालात श्योपूर (मध्य प्रदेश) येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पदभारही स्वीकारला आहे.

नवजीवन यांच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल माहिती देताना त्यांचे वडील व मविप्र समाजाचे माजी उपसभापती विजय पवार यांनी सांगितले की, मुलांचे आयुष्य घडविण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे साधन होते. त्यांच्या शिक्षणासाठी एका टप्प्यावर माझ्या आवडीच्या राजकारण या विषयातून मी पूर्णत: लक्ष काढून घेत मुलांच्या शैक्षणिक प्रगती व प्रोत्साहनावर केंद्रीत केले. मुलांनी या निर्णयास कतृत्वाने प्रतिसाद दिल्याने आज पूर्ण कुटुंबाला समाधान वाटते आहे.

– – –

आगमनातच धडाकेबाज कामगिरी

मध्यप्रदेशातील श्योपूर येथे सध्या नवजीवन पवार यांनी नुकताच सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. आगमनानंतर अवघ्या आठवड्यातच तेथील जिल्हाधिकाऱ्यांसमवेत नवजीवन यांनी बाइकवरून अचानक जिल्हा रुग्णालयास भेट देत ‘स्टिंग ऑपरेशन’ केले. खुद्द जिल्हाधिकारी रुग्णालयाची कोपरा अन् कोपऱ्यात पाहणी करताहेत याचा गंधही तेथील डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना आला नाही. यानंतर तेथील डॉक्टरांना बोलावून घेत जिल्हाधिकारी श्रीवास्तव व सहाय्यक जिल्हाधिकारी पवार यांनी असुविधांवर बोट ठेवत समज दिली. तळागाळातील व्यवस्थेवर इतक्या बारकाईने नजर ठेवणारे अधिकारी मिळाल्याने तेथील जनतेने समाधान व्यक्त केले आहे. पवार यांच्यामुळे महाराष्ट्राचे व नाशिक जिल्ह्याचे नाव मध्य प्रदेशमध्येही उंचावले जात आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

covid 19 vaccine: करोना लसः रजिस्ट्रेशन करताना ‘या’ चुका करू नका – covid 19 vaccine online 5 things to be careful about while registering

हायलाइट्स:करोना लस देशात उपलब्ध असून ती अनेकांनी घेतली आहे लवकरच सर्वसामान्यांसाठी उपलब्ध केली जाणार आहे या लस संबंधी कोणीही काहीही मागितले तर त्यावर...

Kunkeshwar Fair: करोनाचा धसका! श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्रा पहिल्यांदाच अशा पद्धतीनं साजरी होणार – sindhudurg: kunkeshwar fair of devgad cancelled due to coronavirus

हायलाइट्स:राज्यात करोनानं पुन्हा खाल्ली उचलधार्मिक कार्यक्रम, यात्रांवर निर्बंधकोकणातील श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्राही रद्दसुरेश कौलगेकर । सिंधुदुर्गदक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र...

Religious Freedom Act: Love Jihad : मध्य प्रदेश विधानसभेत ‘लव्ह जिहाद’विरोधात ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ मंजूर – mp religious freedom act aims to penalize love jihad...

हायलाइट्स:याआधी, धर्मस्वातंत्र्य अध्यादेशाला राज्यपालांनी दिली होती मंजुरी'लव्ह जिहाद' विरोधात कडक शिक्षेची तरतूद१-१० वर्षांची कैद आणि १ लाखांपर्यंतच्या आर्थिक दंडाची तरतूदभोपाळ : मध्य प्रदेशात...

Recent Comments