Home आपलं जग करियर career news News : रद्द होणार जेईई मेन, नीट परीक्षा? काय म्हणाले...

career news News : रद्द होणार जेईई मेन, नीट परीक्षा? काय म्हणाले मंत्री वाचा… – jee and neet exams may gets scrap nta will submit recommendations


JEE Main, NEET Exam: देशभरातील अभियांत्रिकी आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या अनुक्रमे जेईई मेन आणि नीट या परीक्षांचा कोविड-१९ स्थितीच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. ही समिती आपल्या शिफारशी लवकरच नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाला देणार आहे. यानंतर या दोन्ही परीक्षा होणार वा नाही यासंदर्भातील निर्णय जाहीर केला जाणार आहे. स्वत: केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी ही माहिती दिली.

जेईई परीक्षेला बसलेले विद्यार्थी, पालकांची सातत्याने मागणी होत आहे की कोविड – १९ ची वर्तमान परिस्थिती पाहता विद्यार्थी हित लक्षात घेऊन या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या पाहिजेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले की, ‘एनटीएच्या महासंचालकांना मी विनंती केली होती त्यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक समिती नेमावी. बैठकीत ठोस निर्णय घेतला जावा आणि शुक्रवार ३ जुलै पर्यंत शिफारशी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाकडे पाठवाव्यात. जेणेकरून मंत्रालय या परिस्थितीत परीक्षांसंदर्भातील एक ठोस निर्णय घेईल.’

कमिटी ज्या शिफारशी देईल त्यावर विचार करून त्यानंतरच नीट आणि जेईई मेन परीक्षांसदर्भात निर्णय जाहीर करण्यात येईल. या परीक्षांसंदर्भात ठोस निर्णय घेतला जाईल, अशी माहिती निशंक यांनी दिली. पोखरियाल यांनी ही माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. त्यासाठी त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामुळे आता हे निश्चित झाले आहे की लवकरच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय या दोन महत्त्वाच्या प्रवेश परीक्षांसंदर्भातील निर्णय जाहीर करणार आहे.

UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलता येणार

CBSE बोर्डाची शाळांना सूचना; ‘या’ विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा

देशातील आयआयटींमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी जेईई मेन ही परीक्षा होते. त्यात उत्तीर्ण होणारे विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र ठरतात. जेईई मेन १८ ते २३ जुलै २०२० या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी NEET ही परीक्षा घेतली जाते. २६ जुलै रोजी ही परीक्षा होणार असून यामध्ये सुमारे १६ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसंदर्भातील एक याचिकाही पॅरेंट असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. देशभरात कोविड-१९ विषाणूचे संक्रमण कमी झालेले नाही. संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यात येण्याची मागणी जोर धरत आहे. बुधवारी १ जुलै रोजी रात्री टि्वटरवर #RIPNTA या हॅशटॅगसह एक मोहिम चालवण्यात आली. त्यात या परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारे लाखो ट्विट्स विद्यार्थी-पालकांनी केले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

milk procedure farmers: शेतकऱ्यांना दुधाने तारलं; शंभर कोटीच्या बोनसने गोड होणार दिवाळी – 100 crore bonus for milk procedure farmers in kolhapur gokul warna...

म. टा. प्रतिनिधी, कोल्‍हापूरः गतवर्षी महापूराने तर यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, पण अशा कठीण काळात दूग्ध व्यवसायाने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला....

free corona vaccine: मोफत करोना लशीवर सर्वच भारतीयांचा हक्क: अरविंद केजरीवाल – all indian citizens have the right to get free corona vaccine says...

नवी दिल्ली: बिहार निवडणुकीसाठी (Bihar Election 2020) आपल्या जाहीरनाम्यात (Election Manifesto) भारतीय जनता पक्षाने (BJP) सर्व बिहारी जनतेला करोना लस मोफत देण्याची घोषणा...

Recent Comments