Home आपलं जग करियर cbse: सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या प्रलंबित परीक्षा रद्द - cbse exam 2020 exams...

cbse: सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या प्रलंबित परीक्षा रद्द – cbse exam 2020 exams for class 10th and 12th scheduled for july 1-15 have been cancelled, cbse tells sc


CBSE Exams 2020: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या प्रलंबित विषयांच्या परीक्षा बोर्डाने रद्द केल्या आहेत. सीबीएसई बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाची माहिती आज गुरुवारी २५ जून रोजी दिली. सीबीएसईच्या विद्यार्थी, पालकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या परीक्षा १ ते १५ जुलै या कालावधीत होणार होत्या.

कोणत्या आधारावर होणार मूल्यांकन?

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या बैठकीत बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करणे सोपे आहे. पण बारावीच्या निकालासंबंधी हे थोडे कठीण आहे. कारण बारावीच्या गुणांच्या आधारे इंजिनीअरिंग, मेडिकलसह अन्य उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश दिले जातात. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण दिल्यास विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो.

म्हणून बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गेल्या तीन परीक्षांमधील त्यांच्या कामगिरीच्या आधारे गुण दिले जातील. याव्यतिरिक्त काही महिन्यांनतंर होणाऱ्या श्रेणी सुधार परीक्षेला बसण्याचा पर्यायही त्यांना दिला जाईल. विद्यार्थ्यांची इच्छा असेल तर या परीक्षेला बसून ते आपली श्रेणी सुधारू शकतील.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nashik corona update: Coronavirus : नाशिक जिल्ह्यात ३२४ नवे रुग्ण; तिघांचा मृत्यू – nashik reported 324 new corona cases and 3 deaths in yesterday

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकजिल्ह्यात करोना संशयितांची संख्याही वाढत असून, तब्बल १,२४८ अहवाल प्रलंबित म्हणजेच रांगेत आहेत. शुक्रवारी ३२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले...

coronavirus in aurangabad: जेवणास विलंबामुळे करोनाबाधित रस्त्यावर – corona patients came to road due to they not getting lunch in aurangabad

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकोविड केअर सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना महापालिकेतर्फे चहा-नाष्टा व जेवण दिले जाते. किलेअर्क येथील कोविड केअर सेंटरमध्ये शुक्रवारी दुपारचे जेवण...

Recent Comments