मंडळाच्या नोटीसमध्ये म्हटले आहे, ‘मंडळाच्या असे निदर्शनास आले आहे की शाळा सीबीएसईच्या निर्णयाचे पालन करीत नाहीत आणि नववी आणि अकरावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा उत्तीर्ण होण्याची संधी देत नाहीत.’
सीबीएसईने म्हटले आहे की सुनावणी दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने १३ मे रोजीची अधिसूचना फेटाळलेली नाही. कोणत्याही प्रकारे गोंधळ न घालता या सूचनांचे पालन करण्यास सीबीएसईने शाळांना सांगितले आहे. मंडळाने म्हटले आहे की शाळा ऑनलाइन / ऑफलाइन / नाविन्यपूर्ण चाचण्या घेऊ शकतात आणि परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय घेऊ शकतात.
हेही वाचा: नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी; आरोग्य मंत्रालयाला पत्र
फीविषयीचे अधिकार खासगी शाळांनाच: हायकोर्ट
दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द
ईशान्य दिल्लीत उसळलेल्या हिंसाचाराचा त्या भागातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर परिणाम झाला होता. बारावीच्या उर्वरित परीक्षा देशभरात झालेल्या लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आल्या. दहावीची परीक्षा ईशान्य दिल्लीत होणार होती तर उर्वरित बारावीच्या परीक्षा देशभर घेण्यात येणार होत्या. सीबीएसई दहावी आणि बारावीची ही परीक्षा १ ते १५ जुलै २०२० या कालावधीत घेण्यात येणार होती, पण आता तीदेखील रद्द करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल विशिष्ट फॉर्म्युलाच्या आधारे तयार केला जाईल. आयसीएसईनेही परीक्षा रद्द केली आहे. ५ जुलै रोजी सीटेटची अर्थात केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा होणार होती. सीबीएसईने ती परीक्षाही तूर्त स्थगित केली आहे.
सीबीएसईची संपूर्ण सूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.