Home आपलं जग करियर cbse exam: CBSE Exam 2020: रद्द होणार सीबीएसई बारावी परीक्षा? - cbse...

cbse exam: CBSE Exam 2020: रद्द होणार सीबीएसई बारावी परीक्षा? – cbse exam 2020 cbse may scrap class 12 exam


केंद्रीय माध्यमिक शिक्षम मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द होऊ शकतात आणि विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण दिले जाऊ शकतात. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार विद्यार्थ्यांना नंतर परीक्षा देण्याचा पर्यायही दिला जाऊ शकतो. कोविड – १९ चं वाढतं संक्रमण लक्षात घेता या परीक्षेचं आयोजन करणं कठिण आहे. शिवाय काही विदयार्थ्यांच्या पालकांनी ही परीक्षा रद्द व्हावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. येत्या मंगळवार पर्यंत परीक्षेसंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश बोर्डाला दिले आहेत.

‘सीबीएसई देशभरातील १५ हजार परीक्षा केंद्रांवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी परीक्षा केंद्रांमध्ये वाढ करण्यात आली. आधी तीन हजार परीक्षा केंद्रे होती. सीबीएसई करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणार असली तरी लाखो विद्यार्थ्यांचे आरोग्य परीक्षांमुळे धोक्यात येऊ शकते,’ अशी भीती पालकांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे.

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा १ जुलै ते १५ जुलै या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. बारावीच्या प्रलंबित विषयांपैकी केवळ २९ मुख्य विषयांच्या परीक्षा होणार आहेत.

MHT-CET: ६० हजार विद्यार्थ्यांनी बदलले परीक्षा केंद्र

बारावीच्या पुढील विषयांच्या परीक्षा शिल्लक –

संपूर्ण देशात –

बिजनेस स्टडीज
भूगोल
हिंदी (इलेक्टिव)
हिंदी (कोअर)
होम सायन्स
सोशियोलॉजी
कॉम्प्युटर सायन्स (ओल्ड)
कॉम्प्युटर सायन्स (न्यू)
इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस (ओल्ड)
इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस (न्यू)
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
बायो-टेक्नॉलॉजी

हेही वाचा: पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द; जीआर निघाला

ईशान्य दिल्लीत –

इंग्लिश इलेक्टिव (एन)
इंग्लिश इलेक्टिव (सी)
इंग्लिश कोअर
मॅथ्स
इकॉनॉमिक्स
बायोलॉजी
पॉलिटिकल सायन्स
हिस्ट्री
फिजिक्स
अकाउंटन्सी
केमिस्ट्रीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments