Home आपलं जग करियर CBSE exams 2020: CBSE Notification: परीक्षेसंदर्भात बोर्डाची महत्त्वाची सूचना - cbse exams...

CBSE exams 2020: CBSE Notification: परीक्षेसंदर्भात बोर्डाची महत्त्वाची सूचना – cbse exams 2020 cbse board notification regarding exam centres of 10th 12th exams


दहावी आणि बारावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षेसाठी सीबीएसईकडून महत्त्वाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. करोना व्हायरस संसर्गानंतर उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारी ही सूचना आहे. करोना व्हायरसच्या साथीमुळे बरेच विद्यार्थी आपापल्या घरी परतले आहेत. अशा परिस्थितीत ते आधीच देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रात परीक्षा देऊ शकणार नाहीत. हे लक्षात घेऊन त्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय सीबीएसईने अन्य विद्यार्थ्यांसाठी ते ज्या शाळेत शिकत आहेत त्याच शाळेत परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे. त्यांना यापूर्वी जे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे, तेथे परीक्षा होणार नाही. सामान्यत: सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा ज्या शाळेत विद्यार्थी शिकत आहेत त्याच शाळेत होत नाहीत. त्याच जिल्ह्यातील इतर परीक्षा केंद्रे विद्यार्थ्यांना देण्यात येतातत. परंतु करोनाव्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा नियम बदलण्यात आला आहे.

वैयक्तिक पातळीवर परीक्षा केंद्र बदलता येणार नाहीत

विद्यार्थी परीक्षा केंद्र बदलण्याची विनंती त्यांच्या शाळेमार्फत करू शकतील . ते परीक्षेचे केंद्र बदलण्याची मागणी मंडळाला वैयक्तिकरित्या करू शकत नाहीत. सीबीएसई विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र एखाद्या नव्या जिल्ह्यातील बोर्डाश संलग्न शाळेत देण्यात येईल. एखाद्या विद्यार्थ्याला त्याच जिल्ह्यात परीक्षा केंद्र हवे असेल तर ते शक्य होणार नाही. परीक्षा केंद्र बदलल्यास दुसर्‍या जिल्ह्यात नवीन परीक्षा केंद्र वाटप केले जाईल.

संपूर्ण अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

परीक्षा १ ते १५ जुलै दरम्यान

सीबीएसईच्या उर्वरित विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक आले आहे. उर्वरित विषयांपैकी मुख्य विषयांची परीक्षा होणार आहे. दहावीची परीक्षा जेथे िहंसाचार झाला त्या ईशान्य दिल्लीतील विद्यार्थ्यांसाठी असेल, उर्वरित नाही. त्याचबरोबर बारावीची परीक्षा देशभरातील विद्यार्थ्यांसाठी असेल.

हेही वाचा: ‘परीक्षा रद्द’ निर्णयाला राज्यपाल कोश्यारी यांचा विरोध

दहावी-बारावीचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात?

लॉकडाउनमुळे परीक्षा स्थगित

करोना व्हायरस महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला आणि सीबीएसईच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. लॉकडाऊनमुळे देशभरात शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे व अन्य शैक्षणिक संस्था बंद आहेत. देशभरातील परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सर्वच राज्यात पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात प्रमोट करण्यात आले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Manohar Lal Khattar: ‘शेतकऱ्यांना MSP बाबत कुठलीही अडचण आली, तर राजकारण सोडून देईन’ – manohar lal khattar targets punjab cm captain amarinder singh on...

नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात ( farm laws) शेतकऱ्यांनी मोर्चा ( farmers protest ) उघडला आहे. आता त्यावरून राजकार रंगलं आहे. पंजाबचे...

ms dhoni: महेंद्रसिंग धोनीने पार्टीमध्ये केला भन्नाट डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल… – indian former captain ms dhoni dance in a party, chennai super kings’...

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीला आपण सर्वच कॅप्टन कूल म्हणून ओळखतो. त्यामुळे धोनीला आतापर्यंत कोणत्याही पार्टीमध्ये तुम्ही नाचताना पाहिले नसेल. पण धोनीचा एक...

Navi Mumbai Municipal Corporation: गुड न्यूज! ठाण्यानंतर आता नवी मुंबईतही नाट्यगृहांना मिळणार भाडे सवलत – navi mumbai municipal corporation has decided take discount to...

मुंबई टाइम्स टीमगेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले नाट्यप्रयोग सुरू व्हावेत म्हणून नाट्यसृष्टीकडून विविध प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाच्या प्रयत्नांना...

Recent Comments