Home आपलं जग करियर cbse icse results: CBSE, ICSE १० वी, १२वीच्या परीक्षांचा निकाल १५ जुलै...

cbse icse results: CBSE, ICSE १० वी, १२वीच्या परीक्षांचा निकाल १५ जुलै पर्यंत – cbse, icse board exam results will be declared by mid of july boards informs in sc


नवी दिल्ली:
सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी परीक्षा रद्द करण्याच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मान्यता दिली. यानुसार, दोन्ही बोर्डांच्या जुलैमधील परीक्षा होणार नाहीत. परीक्षा न घेताच, योग्य मूल्यांकन पद्धतीने १५ जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दाखवला.

न्या. ए. एम. खानविलकर यांनी बोर्डाच्या मूल्यांकन योजनेवर समाधान व्यक्त केले आणि त्यांना परीक्षेसंदर्भातील अधिसूचना काढण्याची परवानगी दिली.

सीबीएसई बोर्डाची बाजू मांडणारे वकील महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की बोर्डाचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या बाजूने आहे. विद्यार्थ्यांवर ठराविक कालावधीत परीक्षा देण्याबाबत कोणताही दबाव आणला जाणार नाही. परीक्षा देण्याचा पर्याय विद्यार्थ्यांवर सोडण्यात आला आहे. बोर्ड जेव्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेईल, तेव्हा विद्यार्थ्यांनी त्यांना परीक्षा द्यायची वा नाही ते ठरवायचे आहे.

सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या प्रलंबित परीक्षा रद्द

दरम्यान, आयसीएसई बोर्डच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पूर्वपरीक्षा व अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे पर्यायी मूल्यांकन करण्याची पद्धत आठवड्याभरात वेबसाईटवर प्रसिद्ध करू, अशी हमी आयसीएसई बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात दिली.
ही पद्धत बहुतांश सीबीएसई बोर्डने ठरवलेल्या पद्धतीप्रमाणेच असेल, अशीही माहिती आयसीएसई बोर्डच्या वकिलांनी दिली. सीबीएसई बोर्डप्रमाणेच परीक्षा रद्द करून इच्छुक विद्यार्थ्यांना तो पर्याय नंतर उपलब्ध करण्याचा आणि परीक्षेस इच्छुक नसणाऱ्या विद्यार्थ्यांना पर्यायी गुण पद्धत स्वीकारण्याचा पर्याय देणाऱ्या निर्णयाची अधिसूचना आयसीएसई बोर्डने आज सर्वोच्च न्यायालयात सादर केली.

ICSE बोर्डाच्याही दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द

दोन्ही बोर्डांनी परीक्षांचे निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर करणार असल्याचे न्यायालयाला सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

mumbai: मुंबई: मालकाशी वाद; ड्रायव्हरनं ३ कोटींच्या ५ बस दिल्या पेटवून – mumbai driver arrested for setting five buses on fire after dispute with...

मुंबई: ट्रॅव्हल एजन्सीत ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या मुंबईतील व्यक्तीने जवळपास ३ कोटी रुपये किंमतीच्या पाच बस पेटवून दिल्या. मालकाने पैसे दिले नाहीत म्हणून...

petrol diesel rate stable today: इंधन दर ; जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव – petrol diesel rate today

मुंबई : जागतिक बाजारातील महागाईचे कारण पुढे करून पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. २०२१ च्या पहिल्या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलमध्ये आठ...

poultry industry in nashik: पोल्ट्री व्यवसायाचे ५० कोटींचे नुकसान – poultry industry losses 50 crore rupees due bird flu scare in nashik district

म. टा. प्रतिनिधी, नाशिकदेशाच्या विविध भागांसह राज्यात शिरलेल्या बर्ड फ्लूच्या धास्तीचा परिणाम पोल्ट्री उद्योगात अग्रेसर असणाऱ्या नाशिक जिल्ह्यात सुमारे ५० कोटी रुपयांचे नुकसान...

Recent Comments