Home आपलं जग करियर cbse marks formula: सीबीएसई १० वी, १२ वी म्यूल्यांकनाचा 'असा' आहे फॉर्म्युला...

cbse marks formula: सीबीएसई १० वी, १२ वी म्यूल्यांकनाचा ‘असा’ आहे फॉर्म्युला – cbse board students will be passed on the basis of specific formula, declares board


सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासंबंधीची अधिकृत नोटीस जारी केली आहे. सीबीएसईद्वारे जारी केलेलं हे निवेदन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विट केलं आहे. पोखरियाल यांनी ट्विट करून या नोटीशीसंदर्भातली माहिती दिली आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करताना बोर्डाने परीक्षा रद्द करण्याचा आणि वैकल्पिक परीक्षेचा पर्याय दिला आहे, तसेच मूल्यांकनाचा फॉर्म्युला दिला आहे. ज्यांचे तीन पेक्षा अधिक पेपर झाले आहेत त्यांना बेस्ट ३ च्या सरासरीने अन्य विषयांमध्ये गुण मिळणार आहेत. ज्यांचे ३ पेपर झाले आहेत त्यांना बेस्ट २ च्या सरासरीने गुण मिळणार आहेत. केवळ बारावीच्या विद्यार्थ्यांना ऐच्छिक परीक्षांची संधी मिळणार आहे.

सीबीएसई दहावी, बारावी परीक्षेच्या मूल्यांकनासाठी पुढील फॉर्म्युला –

– ज्यांचे तीन पेक्षा अधिक पेपर झाले आहेत त्यांना बेस्ट ३ च्या सरासरीने अन्य विषयांमध्ये गुण दिले जाणार

– ज्यांचे ३ पेपर झाले आहेत त्यांना बेस्ट २ च्या सरासरीने गुण मिळणार

– ज्यांनी केवळ १ किंवा २ पेपर दिले आहेत त्यांचे गुण अंतर्गत मूल्यमापनानुसार दिले जातील.

दिल्लीतील शाळा ३१ जुलैपर्यंत बंद राहणार

आयसीएसईचे मूल्यांकनही सीबीएसईप्रमाणेच

आयसीएसई बोर्डच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पूर्वपरीक्षा व अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे पर्यायी मूल्यांकन करण्याची पद्धत आठवड्याभरात वेबसाईटवर प्रसिद्ध करू, अशी हमी आयसीएसई बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात दिली. ही पद्धत बहुतांश सीबीएसई बोर्डने ठरवलेल्या पद्धतीप्रमाणेच असेल, अशीही माहिती आयसीएसई बोर्डच्या वकिलांनी दिली. सीबीएसई बोर्डप्रमाणेच परीक्षा रद्द करून इच्छुक विद्यार्थ्यांना तो पर्याय नंतर उपलब्ध करण्याचा आणि परीक्षेस इच्छुक नसणाऱ्या विद्यार्थ्यांना पर्यायी गुण पद्धत स्वीकारण्याचा पर्याय देणाऱ्या निर्णयाची अधिसूचना आयसीएसई बोर्डने सर्वोच्च न्यायालयात सादर केली.

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्दच; PM मोदींना ठाकरेंचं पत्र

CBSE, ICSE १० वी, १२वीच्या परीक्षांचा निकाल १५ जुलै पर्यंत

निकाल १५ जुलैपर्यंत

सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे मूल्यांकन वर सांगितलेल्या पद्धतीनुसार करून निकाल १५ जुलैच्या आत जाहीर करण्यात येणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी बारावीच्या गुणांची आवश्यकता असते. हे ध्यानात घेऊन लवकरात लवकर मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडली जाईल, अशी हमी बोर्डाने न्यायालयात दिली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

tb hospital mumbai: रुग्णालयात शौचालयात रुग्णाचा कुजलेला मृतदेह – 27 years tb patient body was found in toilet in a tb hospital mumbai

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईशिवडीच्या टीबी रुग्णालयातील शौचालयात रविवारी रुग्णाचा कुजलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णाचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला, तसेच मृतदेह...

land acquisition cases: भूसंपादन प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी – mns corporater salim shaikh demand for inquiry into land acquisition cases

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीने प्राधान्यक्रम ठरवून मंजूर केलेल्या भूसंपादन प्रकरणांवर मनसेचे नगरसेवक सलिम शेख यांनी आक्षेप घेतला आहे. पहिल्या...

Recent Comments