Home आपलं जग करियर CBSE students: 'CBSE फॉर्म्युला अकरावी प्रवेशात राज्यातील विद्यार्थ्यांना मारक' - maharashtra government...

CBSE students: ‘CBSE फॉर्म्युला अकरावी प्रवेशात राज्यातील विद्यार्थ्यांना मारक’ – maharashtra government state board students might get less marks compared to cbse students bjp mla raised issue


सीबीएसई बोर्डाच्या जुलै मध्ये होऊ घातलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षा करोना संकटामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. या काही विषयांच्या प्रलंबित परीक्षा होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे या परीक्षा न देता मूल्यांकन करण्यासाठी बोर्डाने बेस्ट थ्री, बेस्ट टू असे पर्याय दिले आहेत. या बोर्डाच्या विद्यार्थ्यांना हे पर्याय मिळाल्यास दहावीच्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना तुलनेने कमी गुण मिळणार आणि ते अकरावी प्रवेशांमध्ये मागे पडणार अशी भीती भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे. या निमित्ताने पुन्हा शिक्षणासंबंधी अनेक प्रश्न उपस्थित करून त्यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

१) CBSC च्या मुलांना “बेस्ट आँफ थ्री” नुसार गुण मिळणार आणि SSC बोर्डाच्या मुलांना “बेस्ट आँफ फाईव्ह” नुसार गुण?
मग SSC बोर्डाचे विद्यार्थी अकरावी प्रवेशात मागे पडणार?

२) SSC बोर्डाच्या मुलांवर “सरासरी सरकारमुळे” अन्याय होणार!

३) एटीकेटीच्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थ्यांचा निर्णय कधी होणार?

४) शाळांनी शुल्कवाढ करु नये याबाबत घेतलेला निर्णय टिकला नाही. सरकारने न्यायालयात बोटचेपी भूमिका का घेतली?

५) या अंतरिम स्थगितीला सरकार पुन्हा न्यायालयात आव्हान देणार ? की संस्था चालकांचा फायदा करणार?

६)अंतिम वर्षे पदवी परिक्षांबाबत देशपातळीवर एकसुत्री निर्णय व्हावा म्हणून विद्यापीठ अनुदान आयोग निर्णय घेणार अशा बातम्या आल्या तोपर्यंत महाराष्ट्रात गृहपाठ न करता घेतलेला निर्णय “जैसेथे” ठेवण्यास सरकार तयार नाही.

७)गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा छळ कधी रोखणार?

सीबीएसई १० वी, १२ वी म्यूल्यांकनाचा ‘असा’ आहे फॉर्म्युला

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्दच; PM मोदींना ठाकरेंचं पत्र

राज्या मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना गेली काही वर्षे बेस्ट फाइव्हनुसार गुण देऊन अकरावी प्रवेश केले जात आहेत. सीबीएसईच्या विदयार्थांना सरासरी बेस्ट फाइव्ह किंवा बेस्ट ३, बेस्ट ४ असे गुण दिले तर त्यांना वाढीव गुण मिळणार, त्यामुळे अकरावी ऑनलाइन प्रवेश घेताना विद्यार्थी मागे पडणार. सीबीएसईच्या मूल्यांकर धोरणामुळे राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होईल , असे शेलार यांना वाटते.

CBSE, ICSE १० वी, १२वीच्या परीक्षांचा निकाल १५ जुलै पर्यंत

काय आहे CBSE चा मूल्यांकनासाठी फॉर्म्युला?

– ज्यांचे तीन पेक्षा अधिक पेपर झाले आहेत त्यांना बेस्ट ३ च्या सरासरीने अन्य विषयांमध्ये गुण दिले जाणार

– ज्यांचे ३ पेपर झाले आहेत त्यांना बेस्ट २ च्या सरासरीने गुण मिळणार

– ज्यांनी केवळ १ किंवा २ पेपर दिले आहेत त्यांचे गुण अंतर्गत मूल्यमापनानुसार दिले जातील.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आस्करसाठी निवडण्यात आलेल्या 'जल्लीकट्टू'ची कथा आहे तरी काय?

मुंबई टाइम्स टीम जगभरात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या पुरस्कारांसाठी भारताकडून '' या मल्याळी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. ९३व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी हा सिनेमा...

love jihad: महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ विरोधाचे सूर; ‘या’ संघटनेचा पुढाकार – rashtriya warkari parishad demands anti love jihad law in maharashtra

अहमदनगर: उत्तर प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा लव्ह जिहाद विरोधी कायदा त्वरित लागू करावा, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने केली आहे. या संदर्भात त्यांनी...

indian railway special train: Indian Railway : ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार ‘या’ १३ विशेष रेल्वे – indian railways 13 special train service extended till...

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या पूर्व - मध्य रेल्वे झोनकडून करोना काळात चालवण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेच्या संचालन कालावधीत वाढ केल्याचं जाहीर करण्यात आलंय....

Recent Comments