Home ताज्या बातम्या cctv videoभरधाव ट्रकनं दुचाकीस्वाराला चिरडलं, भीषण अपघाताचा थरारक VIDEO accident scooter-rider-crushed-under-truck in...

cctv videoभरधाव ट्रकनं दुचाकीस्वाराला चिरडलं, भीषण अपघाताचा थरारक VIDEO accident scooter-rider-crushed-under-truck in una at himachal pradesh mhkk | National


चौकात झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

ऊना, 24 जून : ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हिमाचल प्रदेशातील ऊना मुख्यालयाच्या मुख्य चौकात हा भीषण अपघात घडला आहे. हा भीषण अपघाताचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. त्याचबरोबर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा मुख्यालयाच्या ट्रॅफिक लाइट चौकात ट्रकच्या धडकेत 85 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. संपूर्ण अपघात सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. अरविंद मार्गावर राहणाऱ्या बलवीरसिंग पुत्र साहिब दत्ता असं मृताचं नावं आहे.

हे वाचा-हायवेवर गाडी चावलत असतानाच दिसला साप, महिलेनं चालत्या गाडीतून मारली उडी आणि….

मयत हा निवृत्त एसडीओ असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी स्थानिक रुग्णालय ऊना इथे पाठवण्यात आला आहे. ट्रकचालकाविरोधा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

मंगळवारी संध्याकाळी बलवीरसिंग दुचाकीवरून घरी जात असताना ट्रकनं त्यांना चिरडलं. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांनी बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला.

संपादन- क्रांती कानेटकर

First Published: Jun 24, 2020 11:31 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

MNS-BJP alliance: Nashik: मनसेच्या ‘या’ दोन निर्णयांमुळं नव्या राजकीय समीकरणांची चर्चा – bjp mns may form alliance to fight nashik municipal election

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकमहापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समिती निवडणुकीतही मनसेने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र...

shiv sena vs bjp in bmc: शिवसेनेवरचा ‘हा’ आरोप भाजपला भलताच महागात पडला! – maha vikas aghadi parties hit the bjp over distribution of...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईगेल्या वर्षीच्या विकासनिधीचा शिवसेनेकडून गैरवापर झाल्याचा आरोप भाजपलाच महागात पडला आहे. यंदाच्या विकासनिधी वाटपात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि...

maharashtra budget 2021: राज्यात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? अर्थसंकल्पात मोठ्या घोषणेची शक्यता – maha vikas aghadi government trying to give concession in petrol and...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईपेट्रोल व डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढ झाली असल्याने यातून राज्यातील नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी राज्य सरकार...

Recent Comments