Home देश central team to visit maharashtra: करोनाची चिंता का वाढली?; केंद्रीय पथक करणार...

central team to visit maharashtra: करोनाची चिंता का वाढली?; केंद्रीय पथक करणार महाराष्ट्राचा दौरा – corona virus in india central team will visit maharashtra gujrat and telangana amidst increasing corona virus cases


नवी दिल्ली:महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगण राज्यात करोना विषाणूचा वाढता प्रकोप पाहता केंद्र सरकारने या राज्यामध्ये विशेष पथकांची पाठवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांच्या नेतृत्वात हे पछक राज्यांचा दौरा करेल. २६ जून ते २९ जून या कलावधीत हे पथक राज्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करेल, तसेच त्यांच्याशी समन्वय साधून करोनाचा प्रसार रोखण्याच्या प्रयत्नांना चालना देईल.

दरम्यान, देशभरात आज गुरुवारी कोविड-१९चे एका दिवसात १६ हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले. या नंतर एकूण संसर्ग झालेल्या रुग्णाची संख्या ४ लाख ७३ हजारांपर्यंत पोहोचली आहे. करोनाच्या संसर्गामुळे आणखी ४१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नंतर देशभरातील एकूण मृत्यूपावलेल्या रुग्णांची संख्या पोहोचली आहे १४,८९४ वर. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. गेल्या सहा दिवसांपासून सतत दररोज करोनाचे नवे १४ हजारांहून अधिक रुग्ण वाढत आहेत.

देशात २० जूननंतर ९२,५७३ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, १ जून पासून ते आतापर्यंत २ लाख ८२ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, एका दिवसात सर्वाधिक १६,९२२ नवे रुग्ण आढळल्यानंतर देशभरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ४ लाख ७३ हजार १०५ वर पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासांत झालेल्या एकूण ४१८ रुग्णांच्या मृत्यूसह आतापर्यंत मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या १४,८९४ वर पोहोचली आहे.

वाचा: करोना Live: देशभरात एकूण करोनाबाधितांची संख्या पोहोचली ४,७३,१०५ वर

हे आकडे पाहिले असता करोनाबाधित रुग्णांचा बरे होण्याचा दर ५७.४३ टक्के इतका आहे. देशात सध्या १ लाख ८६ हजार ५१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी २ लाख ७१ हजार ६९६ रुग्ण बरे झाले आहेत. यां पैकी एक रुग्ण देश सोडून गेला आहे. देशात करोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये परदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे.

वाचा: करोनावरील औषधाची पहिली खेप महाराष्ट्रासह ५ राज्यांना रवाना

सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात

देशभरात आतापर्यंत करोनामुळे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. महाराष्ट्रात एकूण ६,७३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर दिल्लीचा क्रमाक लागतो. दिल्लीत २,३६५ रुग्णांचा तर गुजरातमध्ये १,७३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

वाचा: करोनाचं लक्षण नाही; पण अचानक मृत्यू; नव्या प्रकारामुळे चिंता वाढली

पाहा, कोणत्या राज्यात झाले किती मृत्यू?

महाराष्ट्र- ६,७३९
दिल्ली- २,३६५
गुजरात- १,७३५
तामिळनाडू- ८६६
उत्तर प्रदेश- ५९६
पश्चिम बंगाल- ५९१
मध्य प्रदेश- ५३४
राजस्थान- ३७५
तेलंगण- २२५
हरयाणा- १८८
कर्नाटक- १६४
आंध्र प्रदेश- १२४
पंजाब- ११३
जम्मू आणि काश्मीर- ८८
बिहार- ५७
उत्तराखंड- ३५
केरळ- २२
ओडिशा- १७
छत्तीसगड- १२
झारखंड- ११
आसाम- ९
पुद्दुचेरी- ९
हिमाचल प्रदेश- ८
चंदीगड- ६
गोवा- २
मेघालय- १
त्रिपुरा- १
लडाख- १Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

shaheen afridi: ‘या’ गोलंदाजाने भारताच्या जसप्रीत बुमराहचा विक्रम मागे टाकला – pakistan shaheen afridi became quickest 100 wickets in t20

नवी दिल्ली: भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह(jasprit bumrah)चा टी-२० मधील विक्रम पाकिस्तानच्या एका गोलंदाजाने मागे टाकलाय. २०१८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहीन...

Recent Comments