Home शहरं मुंबई Chandrakant Patil: 'अर्थचक्र फिरवायचे की दोन किमीमध्ये फिरायचे? एकदाचं ठरवा' - Bjp...

Chandrakant Patil: ‘अर्थचक्र फिरवायचे की दोन किमीमध्ये फिरायचे? एकदाचं ठरवा’ – Bjp Leader Chandrakant Patil Slams Thackeray Sarkar Over Lockdown Mess


मुंबई: लॉकडाऊनवरून राज्यातील जनतेमध्ये असलेल्या संभ्रमावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘अर्थचक्र फिरवायचे की दोन किलोमीटरमध्ये फिरायचे? एकदा काय ते ठरवा. तातडीनं निर्णय घ्या आणि जनतेचा संभ्रम दूर करा,’ अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

वाचा: ‘सरकारच्या अशा वागण्यामुळं आरक्षणाचं काय होईल ही भीती वाटते’

सुमारे महिन्याभरापूर्वी ठाकरे सरकारनं लॉकडाऊनमधून हळूहळू बाहेर पडून ‘पुनश्च हरिओम’ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार संचारबंदीसह अन्य काही निर्बंध शिथिल करण्यात आले होते. मात्र, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्यात करोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. सुरुवातीला पाचशे ते हजाराने वाढणारे रुग्ण आता दिवसाला ५ हजारांनी वाढू लागले आहेत. रुग्णवाढीचा हा आकडा रोज नवनवे उच्चांक गाठत आहे. त्यामुळं सरकारनं ज्या-ज्या भागांत रुग्ण वाढताहेत, तिथं पुन्हा निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे.

वाचा: ‘बजाज देवापेक्षा मोठे आहेत का? त्यांची कंपनी तातडीनं बंद करा’

अलीकडेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना आणखी काही निर्बंध शिथिल करण्याचे सुतोवाच केले होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक भागांत कडक लॉकडाऊन केले जात आहे. गाड्या जप्त केल्या जात आहेत. अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी तेथील परिस्थितीनुसार निर्णय घेत आहेत. अनलॉकिंगचे नियम स्पष्ट करताना घरापासून फक्त २ किमीच्या परिसरात खरेदी करता येईल, अशीही एक सूचना सरकारनं दिली आहे. त्यामुळं नेमकं ‘लॉकडाऊन आहे की अनलॉक’ असा संभ्रम जनतेमध्ये निर्माण झाला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी याच मुद्द्यावरून सरकारवर तोफ डागली आहे. ‘महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे की अनलॉक,’ असा प्रश्न त्यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. ‘अर्थचक्र फिरले पाहिजे, पुनश्च हरी ओम झाले पाहिजे म्हणणारे हे “भ्रमित ठाकरे” सरकार जनतेला फक्त दोन किमीपर्यंत वाहतुकीची परवानगी देते. अशा जुलमी निर्णयाने हे सरकार लोकांना अधिकच संभ्रमात टाकत आहे,’ अशी टीका पाटील यांनी केली आहे.
वाचा: मुंबईत पुन्हा संचारबंदी; पण ‘यांना’ वगळले; मुंबई पोलिसांचा मोठा निर्णयSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

farmers protest: tractor rally : दिल्लीत हिंसक आंदोलन; केंद्राकडून गंभीर दखल, सिंघू सीमेवरून शेतकरी नेते ‘गायब’ – tractor rally violence in farmers protest signs...

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्यांविरोधात ( farmers protest ) शेतकरी ट्रॅक्टर परेडमध्ये ( tractor rally ) मंगळवारी हिंसाचार झाला. शेतकरी आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेड...

R. Ashwin: टीम इंडियामध्ये लागलं मोठं चॅलेंज, पुजाराने ‘ही’ गोष्ट केल्यावर अश्विन अर्धी मिशी ठेवणार – ind vs eng : indian cricketer r. ashwin...

नवी दिल्ली, IND vs ENG : भारतीय संघामध्ये सध्याच्या घडीला एक मोठं चॅलेंज लागलेलं आहे. हे चॅलेंज भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने भरवश्याचा फलंदाज...

Recent Comments