Home महाराष्ट्र chandrakant patil: खडसेंबद्दल विचारताच चंद्रकांत पाटील म्हणाले... रात गयी, बात गयी! -...

chandrakant patil: खडसेंबद्दल विचारताच चंद्रकांत पाटील म्हणाले… रात गयी, बात गयी! – bjp leader chandrakant patil on eknath khadse


पुणे: भाजपला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज बोलणं टाळलं. ‘रात गयी, बात गयी…’ एवढीच प्रतिक्रिया पाटील यांनी खडसेंबाबतच्या प्रश्नावर दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज पुण्यात अटल बस सेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना एकनाथ खडसे यांच्याबद्दल प्रश्न विचारला. मात्र, त्यांनी काहीही बोलणं टाळलं. खडसे हा विषय आता संपला आहे, असंच त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केलं.

हा प्रकार निवडणूक आयोगाच्या नजरेतून कसा सुटला?: शिवसेना

एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेश सोहळ्याच्या भाषणात बोलताना खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये आपल्यावर झालेला अन्याय व कटकारस्थानाचा पाढा वाचला. माझी ताकद काय आहे हे जळगावात मेळावा घेऊन दाखवून देईन, असा इशाराही खडसे यांनी दिला होता. खडसेंच्या इशाऱ्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

वाचा: टायगर अभी जिंदा है… खडसेंच्या निमित्ताने पाटलांचा फडणवीसांना इशारा

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसेंना मंत्रिपद मिळणार अशी चर्चा होती. मात्र, मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नाही, असं शरद पवारांनी काल स्पष्ट केलं. त्यावरून पाटील यांनी काल खडसेंना टोला हाणला होता. ‘राष्ट्रवादी आता खडसेंना काय देते ते पाहूया. खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी दुपारी दोनची वेळ ठरली होती. मात्र, कार्यक्रम उशीर सुरू झाला. खडसे यांना काय द्यायचं हे अजून ठरलेलं नसावं. तुमचं समाधान होईल असं देऊ’ इतकंच आश्वासन त्यांना मिळाल्याचं पाटील म्हणाले. ‘समाधान मानायचं तर ते लिमलेटच्या गोळीवरही मानता येऊ शकतं. पण ते मानता आलं पाहिजे. त्यामुळं खडसेंना लिमलेटची गोळी मिळते की कॅडबरी हे लवकरच कळेल. त्यावर ते समाधानी होणार की पर्याय नाही म्हणून पुढं जाणार हे कळेल, असा चिमटा पाटील यांनी काढला होता.

वाचा: पुणेकरांसाठी खूषखबर! पाच किलोमीटरचा प्रवास फक्त ५ रुपयांतSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

tamil nadu strong winds blow in chennai: ​निवार चक्रीवादळाची लँडफॉल प्रक्रिया सुरू, ३ तासांत पुदुच्चेरीला धडकणार ​ – tamil nadu strong winds blow in...

चेन्नईः बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'निवार' चक्रीवादळाची ( cyclone nivar ) लँडफॉल प्रक्रिया ( nivar expected landfall ) सुरू झाली आहे. चक्रीवादळ हे...

Nashik News : टपाल विभागाचे खासगीकरण नकोच – don’t reject the privatization of the postal department

म. टा. प्रतिनिधी, नाशिकखासगीकरणाच्या विरोधासह अन्य २१ मागण्यांसाठी टपाल युनियन शुक्रवारी (दि.२७) संपावर जाणार आहे. कामबंद ठेवण्यात येणार असल्याने तसेच शनिवारी व रविवारी...

aurangabad News : दक्षता घ्या, पुन्हा ‘लॉकडाऊन’ नकोच – be careful, don’t ‘lockdown’ again

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोना संसर्गाच्या संकटाशी सामना करण्यासाठी व्यापारीवर्गान वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. अनेक महिने सर्व बाजारपेठ बंद होती. त्यामुळे आर्थिक गणित बिघडले...

Recent Comments