Home शहरं पुणे chandrakant patil attacks on goverment: Chandrakant Patil: दोन रुपयांच्या गोळ्यांसाठी २३ रुपये...

chandrakant patil attacks on goverment: Chandrakant Patil: दोन रुपयांच्या गोळ्यांसाठी २३ रुपये का मोजले?: भाजपचा सरकारला सवाल – maharashtra bjp leader chandrakant patil attacks maharashtra goverment over coronavirus pandemic


म. टा. प्रतिनिधी, पुणेः बांद्रा येथे २७ कोटी रुपये खर्च करून तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेल्या कोविड केअर सेंटरच्या टॉयलेटमध्ये समुद्राचे पाणी येऊ लागले आहे, तर त्याचवेळी या सेंटरसमोर असलेल्या रिलायन्सचा मोठा ‘हॉल’ कोविड सेंटरसाठी घेण्यात आला नाही. गोरेगाव येथील कोविड सेंटरमध्ये भाड्याने घेतलेल्या गाद्या, पंखे यांच्या भाड्याच्या रकमेत दुप्पट संख्येने या वस्तू खरेदी होऊ शकतात. तर, बाजारात होमिओपॅथिक गोळ्यांची दोन रुपयांना मिळणारी डबी सरकारकडून २३ रुपयांना खरेदी करण्यात येत असल्याचे धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हे सर्व प्रकार पाहता ठाकरे सरकारचे चाललेय काय, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. (Chandrakant Patil attacks on goverment)

वाचाः राज्यात नेमकं आहे काय? लॉकडाऊन की अनलॉक?; भाजपचा सवाल

पाटील यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ‘मुंबईत तात्पुरत्या स्वरूपात उभ्या केलेल्या कोविड सेंटरमधील अनियमिततेचा समाचार घेतला. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा म्हणतात हे जगण्याचे वर्ष आहे. हे वर्ष कमविण्याचे अथवा राजकारण करण्याचे नाही. टाटा यांचे हे वक्तव्य मला अत्यंत भावले आहे. मात्र, करोनाच्या महामारीमध्ये राज्यात समान धारणा कार्यक्रम राबविण्यात येत नसून प्रत्येक जिल्हा आपअपाल्या परीने निर्णय घेत असल्याने गोंधळाचे वातावरण आहे. यामधून मार्ग काढण्यासाठी राज्याच्या नेतृत्वाला योग्य वेळी भूमिका घ्यावी लागते, ती सध्या घेण्याची गरज आहे,’ असे पाटील यावेळी म्हणाले.

मुंबईत जमावबंदी; काय सुरू राहणार, काय बंद; जाणून घ्या

बांद्रा येथे तात्पुरत्या स्वरुपात उभ्या केलेल्या कोविड केअर सेंटरच्या टॉयलेटमध्ये समुद्राचे पाणी येऊ लागले आहे. मुंबईत अशी परिस्थिती अनेकदा निर्माण होते. याच सेंटर समोर रिलायन्सचा मोठा हॉल असून तेथे कोविड केअर सेंटर करता आले असते. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा घेण्यात आली होती. या सेंटरमध्ये जवळपास तीन हजार बेड तयार झाले असते. एवढी मोठी ही जागा आहे. त्यासाठी रिलायन्सला शब्द टाकावा लागला असता. मात्र, हा हॉल न घेता या ठिकाणी २७ कोटी रुपये खर्च करून तात्पुरत्या स्वरुपाचे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आल्याची टीका पाटील यांनी केली. अशाच प्रकारे गोरेगाव येथेही कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी भाड्याने घेण्यात आलेल्या बेड, गाद्या यांच्या भाड्याच्या रकमेत हेच बेड, गाद्या दुप्पट संख्येने खरेदी करता आल्या असत्या. हे प्रकार नेमके कोणाचे खिसे भरण्यासाठी केले, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

दोन रुपयांची डबी २३ रुपयांना

पुण्यात आम्ही होमिओपॅथीक गोळ्यांची डबी दोन रुपयांना खरेदी करून तिचे नागरिकांना वाटप केले आहे. राज्य सरकार त्याच गोळ्या, डबी हे २३ रुपयांना खरेदी करत असल्याचे उघड झाले आहे. राज्यातील ३ कोटी कुटुंबांना ही डबी वाटण्यात येणार आहे. ही डबी भले सरकारच्या मार्केटिंग फेडरेशनकडून खरेदी करण्यात येत असली तरी तिचा एवढी किंमत का? आपण जर राज्यात मंत्री असतो तर सध्याच्या परिस्थितीत ही डबी ‘सीएसआर’मधून उपलब्ध करून दिली असती, असा टोलाही पाटील यांनी लगावला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

श्वानसंख्येला पालिका रोखणार

म. टा. वृत्तसेवा, कल्याण करोनासंबंधी उपाययोजनांमधून थोडीफार मोकळीक मिळताच पालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांकडे मोर्चा वळवला असून या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी एक कृतीयोजना...

Navi Mumbai: Navi Mumbai: रुग्ण दगावल्याने डॉक्टर, नर्सला मारहाण; रुग्णालयात तोडफोड – navi mumbai deceased patient kin create ruckus at nmmc hospital in vashi

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला रुग्ण दगावल्याने नातेवाइकांनी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांना मारहाण केली. तसेच...

Recent Comments