Home शहरं मुंबई chandrakant patil: chandrakant patil : चौथीची पोरगीही सांगेल यांचं काही खरं नाही;...

chandrakant patil: chandrakant patil : चौथीची पोरगीही सांगेल यांचं काही खरं नाही; चंद्रकांतदादांचे आघाडीला चिमटे – bjp leader chandrakant patil slams thackeray sarkar over mahavikas aghadi


मुंबई: लॉकडाऊनवरून राज्य सरकारमध्ये सुरू असलेल्या गोंधळावर टीका केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे. आज त्यांनी थेट महाराष्ट्र विकास आघाडीतील सुंदोपसुंदीवर टीकास्त्र सोडलं आहे. तुमच्यात मतभेद आहेत हे आम्ही बोलायचं नाही का? चौथीची पोरगी पण सांगेल की यांचं काही खरं नाही, असा चिमटाच चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला काढला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी आघाडीतील वादावर टीकास्त्र सोडलं. हे सरकार मुंबईबाबत एकही धड निर्णय घेत नाही. केवळ मूर्खपणाचे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे आजार राहिला बाजूला मुंबईकर वैतागले आहेत. आम्ही काही बोललो की जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील लगेच बोलतात आम्हाला सत्तेची हाव लागलीय. तुमच्यात मतभेद आहेत हे आम्ही बोलायच नाही का? चौथीची पोरगी पण सांगेल की यांचं काही खरं नाही, अशी टीका चंद्रकांतदादांनी केली.

सार्वजनिक सेवा उद्योगपती मित्रांच्या घशात घालण्याचा डाव; काँग्रेसचा आरोप

सरकारला नक्की काय करायचं आहे. लॉकडाऊन कडक करायचा आहे की अनलॉक करायचं आहे? एकीकडे अनलॉक सुरू करत आहोत सांगितलं जात आहे. दुसरीकडे कडक निर्बंध लादले जात आहेत. नक्की काय चालू आहे हेच कळत नाही. लॉकडाऊनपेक्षा सरकारच्या अनलॉकमध्ये अधिक गोंधळ आहे. त्यामुळे नागरिकांनी नेमकं करायचं तरी काय? असा सवाल पाटील यांनी केला.

करोना रुग्णांची फसवणूक?; मनसेचा आरोग्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

फडणवीसांनी दोन तासात प्रश्न सोडवले असते

या सरकारचा जनतेशी काहीही संबंध राहिला नाही. विरोधकांना विश्वासात घेतलं जात नाही. आम्ही सत्तेत असताना विरोधकांनाही विश्वासात घेत होतो. या सरकारने एकट्या देवेंद्र फडणवीस यांना जरी त्यांचे दिवसांचे दोन तास मागितले असते तरी प्रश्न निकाली निघाले असते. पण या सरकारचा इगो आडवा येतो, दुसरे काय? असा टोलाही त्यांनी हाणला.

Shivsena: चीनची सर्वात मोठी गुंतवणूक गुजरातमध्ये; शिवसेनेचा दावा

दरम्यान, कालही चंद्रकातं पाटील यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. अर्थचक्र फिरवायचे की दोन किलोमीटरमध्ये फिरायचे? एकदा काय ते ठरवा. तातडीनं निर्णय घ्या आणि जनतेचा संभ्रम दूर करा, अशी मागणी पाटील यांनी केली होती. ‘अर्थचक्र फिरले पाहिजे, पुनश्च हरी ओम झाले पाहिजे म्हणणारे हे “भ्रमित ठाकरे” सरकार जनतेला फक्त दोन किमीपर्यंत वाहतुकीची परवानगी देते. अशा जुलमी निर्णयाने हे सरकार लोकांना अधिकच संभ्रमात टाकत आहे,’ अशी टीका ही त्यांनी केली होती.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

rbi vacancy 2021: दहावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी; RBI मध्ये भरती – rbi vacancy 2021 recruitment for security guard posts in reserve bank of...

RBI Recruitment 2021: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) सुरक्षा रक्षक पदांसाठी (security guard) भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या उमेदवारांना...

LIVE : शरद पवार यांनी केली सिरम संस्थेची पाहणी | News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जयंती बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाब्यात पूर्णाकृती पुतळ्याचा सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण सोहळ्याला शरद पवार राहणार उपस्थित फडणवीस, राज ठाकरेही राहणार उपस्थित Source link

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा, सटाणा मागील काही वर्षात शेतात सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने तळवाडे दिगर येथील शेतकऱ्याने शुक्रवारी (दि.२२) आपल्या शेतातील...

Recent Comments