Home महाराष्ट्र Chandrakant Patil taunts Uddhav Thackeray: आम्ही मागे लागल्यामुळे मुख्यमंत्री घरातून बाहेर पडले;...

Chandrakant Patil taunts Uddhav Thackeray: आम्ही मागे लागल्यामुळे मुख्यमंत्री घरातून बाहेर पडले; पाटलांची टोलेबाजी – bjp leader chandrakant patil taunts uddhav thackeray over his upcoming tour


सांगली: ‘आम्ही मागे लागून गोळ्या झाडल्यानंतर मुख्यमंत्री अखेर घरातून बाहेर पडले. घरात बसून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता येत नाही. यासाठी बांधावर जावे लागते,’ असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. याशिवाय राज्यपालांच्या पत्राला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या वयाचे तरी भान राखायला पाहिजे होते, असे मत व्यक्त केले. सांगली येथे रविवारी आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. (Chandrakant Patil criticises Uddhav Thackeray)

वाचा: ‘राज्यपालांची भूमिका गिनीज बुकात नोंद करण्यासारखी’

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून राज्यातील स्थिती पाहावी, असे आम्ही अनेकदा बोललो. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या काळात तरी मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून शेतीची पाहणी करावी. आम्ही सातत्याने मागे लागून गोळ्या झाडल्यानंतर अखेर मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत आहेत. आता त्यांनी स्वतःची जबाबदारी झटकून मदतीसाठी केंद्राकडे बोट दाखवू नये. राज्य सरकारने मदतीसाठी केंद्राकडे रितसर मागणी केली आहे का? कागदावर नुकसानीचा तपशील नोंदवला आहे का? याबाबत अजून काहीच काम झालेले नाही.

वाचा: सगळे पैलवान उभ्याने लोळवले; राष्ट्रवादीने जागवल्या ‘त्या’ आठवणी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील पत्रोत्तराबाबत विचारले असता आमदार पाटील म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्याचा राज्यपालांना अधिकार आहे. यात त्यांची काहीच चूक झाली नाही. उलट मुख्यमंत्र्यांनी पत्राला उत्तर देताना किमान राज्यपालांच्या वयाचे तरी भान राखायला पाहिजे होते. त्यांनी दिलेले उत्तर योग्य नाही.’ सांगली महापालिकेच्या स्थायी समिती आणि प्रभाग समितींच्या निवडींमध्ये चुरस वाढली होती. याबाबत कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना ते म्हणाले, ‘महापालिकेत एकहाती सत्ता असताना स्थायी समिती सभापती पदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक का वाढते? आपले ४३ नगरसेवक असताना त्यांना सहलीला का पाठवावे लागते? राज्यात इतर ठिकाणी काही अडचण येत नाही. मग इथेच असे का? भाजपच्या नगरसेवकांनी याचे आत्मचिंतन करावे.’

वाचा: महाराजांना काय वाटत असेल?; ‘त्या’ चुकीमुळे अमोल कोल्हेंना पडला प्रश्नSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

KXIP vs DC Excellent Bowling From Ashwin To Get The Wicket Of Dangerous Universal Boss – आधी फलंदाजाच्या बुटाची लेस बांधून दिली, मग बोल्ड...

दुबई: आयपीएलमध्ये काल झालेल्या ३८व्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. दिल्लीने विजयासाठी दिलेले १६५ धावांचे लक्ष्य पंजाबने १९व्या षटकात ५...

atul todankar in hungama 2: अभिनेता अतुल तोडणकर करणार ‘हंगामा’; दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत – marathi actor atul todankar share his experience working in hungama...

मुंबई : प्रियदर्शन सोमण नायर यांचा 'हंगामा' हा चित्रपट २००३ साली आला होता. त्यानंतर त्याचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'हंगामा २'मध्ये...

Rajesh Tope News: Coronavirus Health Workers Will Be Vaccinated First Says Rajesh Tope – Rajesh Tope: राज्यात सर्वात आधी करोनाची लस कुणाला?; टोपेंनी केले...

मुंबई:करोना महामारीने जगभरात चित्र बदलले असून आयसीएमआर कडून लस आल्यावर पहिल्यांदा आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार केला जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे...

Recent Comments