Home विदेश china announces 2 billion help: करोना: विकसनशील देशांना चीनकडून १५ हजार कोटींची...

china announces 2 billion help: करोना: विकसनशील देशांना चीनकडून १५ हजार कोटींची मदत – china announces usd 2 billion in coronavirus help at who assembly


बीजिंग: करोनाशी मुकाबला करण्यासाठी चीन जगभरातील देशांना २ अब्ज डॉलर म्हणजे जवळपास १५ हजार कोटींची मदत करणार आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ही घोषणा केली आहे. ही रक्कम दोन वर्षांमध्ये देण्यात येणार आहे. करोनाचा फैलावासाठी चीन जबाबदार असल्याचा आरोप आणि अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेच्या निधीत कपात केल्यानंतर या घोषणेला विशेष महत्त्व आहे.

जागतिक आरोग्य संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक आजपासून सुरू झाली आहे. या बैठकीच्या उद्घाटनच्या सत्राला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शी जिनपिंग यांनी संबोधित केले. जिनपिंग यांनी सांगितले की, करोनाचा मुकाबला करणाऱ्या देशांना चीनकडून २ अब्ज डॉलरची मदत देण्यात येणार आहे. करोनाच्या संसर्गामुळे आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या नुकसान झालेल्या देशांना चीनकडून ही मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय करोना प्रतिबंधक लस विकसित झाल्यास जगातील सर्व नागरिकांच्या आरोग्यासाठी ही लस सर्वांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चीनमधील काही कंपन्या करोनाची लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

वाचा: ‘या’ औषधाच्या वापराने ४ दिवसांत ६० रुग्णांनी दिली करोनाला मात
चीनने करोना संसर्गाची माहिती लपवली असल्याच्या आरोपाचा शी जिनपिंग यांनी इन्कार केला. चीनने करोनाबाबतची सर्व माहिती जागतिक आरोग्य संघटनेला दिली होती. त्याशिवाय, चीनमध्ये सुरू असलेली उपचार पद्धत आणि घेण्यात येणारे खबरदारीचे उपायांची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला वेळेवर दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वाचा:जगातल्या ‘या’ देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा इशारा

दरम्यान, युरोपीयन युनियन आणि ऑस्ट्रेलियासह जवळपास १०० हून अधिक देशांनी करोना व्हायरसच्या फैलावाची चौकशी करण्याची मागणी एका प्रस्तावाद्वारे केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीत हा प्रस्ताव मान्य झाल्यास जागतिक आरोग्य संघटनेला चीनची चौकशी करावी लागू शकते.

आणखी वाचा:
भारत, रशियासह ६२ देश एकवटले; ‘या’ ठरावाने चीनची धाकधूक वाढली
करोना निगेटीव्ह सांगणारे ३० टक्के वैद्यकीय अहवाल चुकीचे !
होय…करोना व्हायरसचे सुरुवातीचे नमुने नष्ट केले: चीनSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pune phd student murder latest news: Pune Crime: पुण्यात पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याचा खून; चेहरा दगडाने ठेचला – 30 year old phd student murdered...

पुणे: पुणे येथील पाषाण भागातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एनसीएल) येथे पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक...

latest opinion poll 2021: Opinion Poll: मोदी-शहांचे आव्हान परतवत ममता साधणार हॅट्ट्रिक!; दक्षिणेतील ‘या’ राज्यात सत्तांतर? – tmc to retain bengal ldf headed for...

हायलाइट्स:पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी हॅट्ट्रिक साधण्याची शक्यता.आसाम भाजपकडे राहणार तर पुदुच्चेरीत कमळ फुलणार.तामिळनाडूत स्टॅलिन तर केरळात डाव्यांची जादू दिसणार.नवी दिल्ली: पश्चिम बंगाल, आसाम,...

Amravati lockdown news: Amravati Lockdown: अमरावती, अचलपुरात लॉकडाऊन वाढवला; ‘हे’ शहरच कंटेन्मेंट झोन! – lockdown in amravati achalpur extended till march 8

हायलाइट्स:अमरावती विभागात अनेक शहरांत करोनाचे थैमान.अमरावती व अचलपूरमध्ये लॉकडाऊन वाढवला.नागपुरातील स्थिती गंभीर, लॉकडाऊन लावला जाण्याची शक्यता.अमरावती: विदर्भात सध्या अमरावतीमध्ये करोनाने थैमान घातले असून...

Recent Comments