Home विदेश china australia tension: चीनच्या दादागिरीविरोधात 'या' देशानेही दंड थोपटले! - china australia...

china australia tension: चीनच्या दादागिरीविरोधात ‘या’ देशानेही दंड थोपटले! – china australia tension updates australia navy buy ship killing missiles


कॅनबरा: आक्रमक विस्तारवादी धोरणामुळे चीनने आपल्या शेजारी देशांसोबत वाद ओढावून घेतला आहे. तर, दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेत चीनविरोधी भूमिका घेतल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरोधातही चीनने भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. चीन आणि ऑस्ट्रेलियातील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. चीनच्या दादागिरीला उत्तर देण्याची तयारी ऑस्ट्रेलियाने केली. इंडो-पॅसिफिक समुद्र भागात ऑस्ट्रेलियन सरकार सैन्याची कुमक वाढवणार आहे.

करोनाच्या मुद्यावर ऑस्ट्रेलियाने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे चीन नाराज झाला आहे. त्याचे पडसाद दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या व्यापारात उमटत आहे. नुकतंच चीन सरकारने आपल्या नागरिकांनी ऑस्ट्रेलियात न जाण्याचा सल्ला दिला होता. इतकंच नव्हे तर चीनने ऑस्ट्रेलियातून आयात करण्यात येणाऱ्या काही मालांवर बंदी आणली आहे. त्याशिवाय काही दिवसांपूर्वी चिनी हॅकर्संनी ऑस्ट्रेलियावर सायबर हल्ला केला होता. ऑस्ट्रेलियन सैन्याचे सशक्तीकरण करण्याचा निर्णय पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी केली आहे. त्यांनी नवीन शस्त्र खरेदीसह आशियाई-पॅसिफिक भागात ऑस्ट्रेलियन सैन्याची कुमक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा: लडाख तणाव: भारताविरोधात पाकिस्तान-चीनचा ‘हा’ कट!

पंतप्रधान मॉरिसन यांनी जाहीर केले की, ऑस्ट्रेलिया सुपर-हॉरनेट लढाऊ विमानांचा ताफा मजबूत करण्यासाठी लांब पल्ल्याच्या अँटी-शिप क्षेपणास्त्रांची खरेदी करणार असून देशाच्या संरक्षण धोरणात बदल करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मित्र देश आणि भूमीच्या संरक्षणासाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेनुसार, हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी अमेरिकेसह चर्चा करण्यात येणार आहे. आशियाई-पॅसिफिक क्षेत्रात ऑस्ट्रेलियाला अमेरिकेकडून मोठे सहकार्य मिळते. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नुकत्याच काही दिवसांमध्ये चीन आणि उत्तर कोरियाने लांब पल्ल्याचा अनेक क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. यामधील काही क्षेपणास्त्रे ही ५५०० किमीपर्यंत मारा करू शकतात. त्यामुळे संरक्षणासाठी ऑस्ट्रेलियाने ही शस्त्रखरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा: चीनसोबत तणाव: भारत-जपान नौदलाचा संयुक्त सराव
वाचा: हिंदी महासागरात ‘हे’ देश चीनला घेरणार

दरम्यान, करोनाच्या महासाथीचा फायदा उचलत चीन हिंदी महासागरात ऑस्ट्रेलियाजवळ एक नाविक तळ उभारण्याच्या प्रयत्नात आहे. चीनने यासाठी करोना आजाराविरोधात लढण्याच्या मदतीच्या नावाखाली सोलोमन बेट आणि पापुआ न्यू गिनीवर गळ टाकण्यास सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाजवळील हे देश करोना महासाथीच्या आजारामुळे आर्थिक संकटात अडकले आहेत. या देशांना चीन मदत देण्याच्या नावाखाली कर्जाच्या ओझ्याखाली फसवण्याच्या प्रयत्नात आहे. या नाविक तळाद्वारे चीनला ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेवर नजर ठेवणे सोपे जाणार असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

वाचा: चीनसोबत तणाव: इस्राएलकडून भारताला मिळणार सुरक्षाकवच!

वाचा: लडाख तणाव: भारताविरोधात पाकिस्तान-चीनचा ‘हा’ कट!

चीनच्या दादागिरीला वेसण घालण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाने परस्पर सहकार्य करण्याबाबत करार केला आहे. हिंदी महासागरात भारत आणि ऑस्ट्रेलियाला चीनचे आव्हान आहे. चीनच्या या विस्तारवादी धोरणाला अटकाव करण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाने करार केला आहे. या करारानुसार भारत अंदमान निकोबार बेट समूहावरील आपल्या नाविक तळाचा वापर ऑस्ट्रेलियाला करण्यास देणार आहे. तर, ऑस्ट्रेलिया इंडोनेशियाजवळील कोकोज बेट समूहांवरील नाविक तळाचा वापर भारताला करू देणार आहे. यामुळे दोन्ही देशांच्या नौदलाला हिंदी महासागरातील मलक्का स्ट्रेट आणि जवळपासच्या परिसरावर करडी नजर ठेवता येणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Prakash Ambedkar: काँग्रेस, डाव्यांना लकवा मारला का ? – vanchit baujan aghadi president prakash ambedkar has criticized congress and leftists over farmers protest

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाददिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठबळ देण्यात काँग्रेस, डावे पक्ष पूर्णत: अपयशी ठरले आहेत. आंदोलनात न उतरण्यासाठी या पक्षांना लकवा मारला आहे...

US Capitol HIll: US Capitol धक्कादायक! अमेरिकन संसदेजवळ हॅँडगन आणि ५०० काडतूसांसह एकाला अटक – man arrested with handgun, ammunition at washington dc checkpoint

वॉशिंग्टन: अमेरिेकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यावर हिंसाचाराचे सावट असताना एका व्यक्तिला पोलिसांनी बंदूक आणि ५०० काडतूसांसह अटक केली. धक्कादायक बाब...

कर्जाला विरोध, म्हणजे असंमजसपणा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक भाजपच्या विकासकामांसाठीच्या तीनशे कोटींच्या कर्जयोजनाला विरोध करणाऱ्या शिवसेनेवर महापौर यांनी जोरदार पलटवार केला आहे. आपल्या प्रभागात कामे करायची...

Recent Comments