Home विदेश china destroying coronavirus sample: होय...करोना व्हायरसचे सुरुवातीचे नमुने नष्ट केले: चीन -...

china destroying coronavirus sample: होय…करोना व्हायरसचे सुरुवातीचे नमुने नष्ट केले: चीन – china admits to destroying early samples of coronavirus


बीजिंग: अमेरिकेकडून करोनाच्या संसर्गाच्या मुद्यावर चीनवर सातत्याने टीका सुरू होत असताना आणखी एक बाब समोर आली आहे. करोना व्हायरसचे सुरुवातीचे नमुने नष्ट करण्यात आल्याची कबूली चीनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुरक्षितेच्या कारणास्तव हे नमुने नष्ट करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतून करोनाचा विषाणू जगभरात फैलावला असल्याची टीका अमेरिकेकडून करण्यात येत होती. चीनने करोना विषाणूचे सुरुवातीचे नमुनेदेखील दिले नसल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. या आरोपाला चीनकडून पुष्टी मिळत असल्याचे समोर येत आहे. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनचे अधिकारी लिउ डेंगफेंग यांनी सांगितले की, प्रयोगशाळेला व्हायरसच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी आणि बायोसेफ्टीच्या अनुषंगाने करोनाचे नमुने नष्ट करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. अनोळखी व्हायरसमुळे निर्माण होणाऱ्या दुसऱ्या महासाथीच्या आजाराच्या धोक्याला कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा: ‘हे’ औषध ठरतेय करोनाच्या संसर्गावर परिणामकारक!
वाचा: ‘रेड लाइट’ परिसर बंद ठेवल्यास नवीन रुग्ण संख्येत ७२ टक्क्यांनी घट!
माहिती लपवणे अथवा इतर देशांना माहिती न देण्यासाठी करोना विषाणूचा नमूना नष्ट करण्यात आला नाही. बायोसेफ्टीच्या मुद्यामुळे नमुने नष्ट करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेने या प्रकरणाला वेगळं रुप दिले असून लोकांमध्ये संभ्रमावस्था तयार करण्यात आले असल्याचेही चीनने म्हटले आहे. विषाणूंना नष्ट करण्याबाबत काही नियम असून एखाद्या विशिष्ट परिस्थितीत विषाणूंना नष्ट केले जात असल्याचे चीनने म्हटले आहे.

आणखी वाचा:
करोना: ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या चाचणीला मोठं यश!

अमेरिकेने चीनवर कारवाई करावी; १८ कलमी प्रस्ताव सादर!करोना संसर्गाचा मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments