Home देश China funding to congress: राजीव गांधी फाउंडेशनला चीनचा पैसा, भाजपचा सनसनाटी आरोप...

China funding to congress: राजीव गांधी फाउंडेशनला चीनचा पैसा, भाजपचा सनसनाटी आरोप – rajiv gandhi foundation received 3 hundred thousand usd from china says bjp


नवी दिल्लीःकाँग्रेस आणि चीनचे छुपे संबंध आहेत. चीनने राजीव गांधी फाउंडेशनला लाखोंची देणगी दिलीय, असा आरोप भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डांसह केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केलाय. चीनने राजीव गांधी फाउंडेशनला पैसे दिले. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा केला. एका कायद्यानुसार कुठलाही राजकीय पक्ष सरकारच्या परवानगी शिवाय विदेशातून पैसा स्वीकारू शकत नाही. मग काँग्रेसने चीनकडून पैसे स्वीकारताना सरकारची मंजुरी घेतली होती का? असा सवाल केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.

आश्चर्य आहे. राजीव गांधी फाउंडेशनला चीन सरकार आणि चीनच्या दुतावासाने २००५-२००६ मध्ये देणगी दिली होती. राजीव गांधी फाउंडेशनच्या देणगीदारांच्या यादीत चीनचा उल्लेख आहे. चीनकडून राजीव गांधी फाउंडेशनला तीनशे हजार अमेरिकी डॉलर इतकी देणगी दिली गेली. हे धक्कादायक आहे, असं जे. पी. नड्डा म्हणाले.

चीनकडून पैसा घेऊन काँग्रेस देशात राजकीय वातावणर निर्माण करतं. चीनशी सुरू असलेल्या या तणावाच्या काळात देशहितासाठी एकजूट असल्याचं सांगत सर्व राजकीय पक्षांनी पंतप्रधान मोदींना समर्थन दिलं आहे. पण फक्त एका घराण्याने विरोध केला आहे. या घराण्याचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत, अशी टीका नड्डा यांनी केली.

डोकलाम वादाची आठवण करून देत नड्डा यांनी राहुल गांधीवर हल्लाबोल केला. गलवान खोऱ्यातील घटनेवर काँग्रेसचे राजकारण सुरू आहे. २०१७ च्या ऑगस्टमध्ये भारत-चीनमध्ये डोकलाममध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी राहुल गांधींनी गुपचुप चीनच्या राजदुतांची भेट घेतली होती. हीच ती काँग्रेस आहे, असं सांगत नड्डांनी घणाघात केला. राजीव गांधी फाउंडेशनला इतका पैसा कुठल्या कारणासाठी दिला गेला. त्यानंतर त्यांनी काय स्टडी केली होती. हे देशाला कळायलाच हवं, असं सांगत नड्डा यांनी स्पष्टीकरणाची मागणी केलीय.

मध्य प्रदेशातील पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांशी संवाद साधताना नड्डा बोलत होते. काँग्रेसने देशात फुटीरतावादाची बीजं रोवली. गेल्या सहा दशकात झालं नाही ते पंतप्रधान मोदींनी करून दाखवलं. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवलं. भारताचे १०६ कायदे आता जम्मू-काश्मीरसाठी लागू होतील, असं नड्डा म्हणाले.

भारत-चीन वाद: चीनने आपले काही सैनिक मागे हटवले, वाहनेही घेतली मागे

काँग्रेसला चीनने पैसे का दिली? हे कसं घडलं? देणगीदारांमध्ये अनेक उद्योगपती, सर्वाजनिक संस्थांची नावं आहेत. एवढं पुरेसं नाहीए का. तरीही चिनी दुतावासाकडून लाच घेतली गेली, असा गंभीर आरोप रविशंकर प्रसाद यांनी केलाय.

चीनने S-400 मिसाईल तैनात केल्यास भारताकडे पर्याय काय?

राजीव गांधी फाउंडेशनला चिनी दुतावासाकडून अनेक काळापासून फंडिंग होत आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी या राजीव गांधी फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत. तर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम आणि काँग्रेसच्या सरचिटणीस सोनिया गांधी या मंडळाच्या सदस्य आहेत. राजीव गांधी फाउंडेशनच्या वार्षिक अहवालानुसात २००५-०६मध्ये आरजीएफला चिनीच्या दुतावासाकडून देणगी मिळाली होती. सामान्य देणगिदारांच्या यादीत चिनी दुतावासाचा समावेश केला गेला, असं भाजपच्या सूत्रांनी यापूर्वी सांगितलं होतं.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pune phd student murder latest news: Pune Crime: पुण्यात पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याचा खून; चेहरा दगडाने ठेचला – 30 year old phd student murdered...

पुणे: पुणे येथील पाषाण भागातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एनसीएल) येथे पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक...

latest opinion poll 2021: Opinion Poll: मोदी-शहांचे आव्हान परतवत ममता साधणार हॅट्ट्रिक!; दक्षिणेतील ‘या’ राज्यात सत्तांतर? – tmc to retain bengal ldf headed for...

हायलाइट्स:पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी हॅट्ट्रिक साधण्याची शक्यता.आसाम भाजपकडे राहणार तर पुदुच्चेरीत कमळ फुलणार.तामिळनाडूत स्टॅलिन तर केरळात डाव्यांची जादू दिसणार.नवी दिल्ली: पश्चिम बंगाल, आसाम,...

Amravati lockdown news: Amravati Lockdown: अमरावती, अचलपुरात लॉकडाऊन वाढवला; ‘हे’ शहरच कंटेन्मेंट झोन! – lockdown in amravati achalpur extended till march 8

हायलाइट्स:अमरावती विभागात अनेक शहरांत करोनाचे थैमान.अमरावती व अचलपूरमध्ये लॉकडाऊन वाढवला.नागपुरातील स्थिती गंभीर, लॉकडाऊन लावला जाण्याची शक्यता.अमरावती: विदर्भात सध्या अमरावतीमध्ये करोनाने थैमान घातले असून...

Recent Comments