Home विदेश china on apps ban: Chinese apps ban भारताचा अॅप बंदीचा दणका; चीनला...

china on apps ban: Chinese apps ban भारताचा अॅप बंदीचा दणका; चीनला आठवला कायदा! – china is strongly concerned, verifying the situation says chinese foreign ministry


बीजिंग: लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत-चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारताच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चीनवर दबाव वाढवण्यासाठी भारत सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर चीनला आता आंतरराष्ट्रीय कायद्याची आठवण झाली आहे. परदेशी गुंतवणूकदारांच्या कायदेशीर अधिकारांचे रक्षण झाले पाहिजे असे चीनने म्हटले आहे.

लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने सुरक्षितेच्या मुद्यावर चिनी कंपन्याच्या ५९ अॅप्सवर बंदी आणली. बंदी घातलेल्या अॅप्सविरोधात अनेक तक्रारी येत होत्या. हे अॅप्स देशाचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि अखंडतेसाठी घातक बनत चालले होते. चीन या अॅप्सद्वारे भारतीयांच्या डेटाशी छेडछाड करू शकत होता, त्यामुळे केंद्र सरकारने या अॅप्सवर बंदी घातली. त्यानंतर मंगळवारी, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर भूमिका मांडली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी सांगितले की, या प्रकरणाबाबत चीन चिंतेत असून याबाबतची सर्व माहिती जमा करण्यात येत आहे. याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. चीन सरकारने कायमच आपल्या देशातील कंपन्यांना अन्य देशांमधील कायद्यांचे पूर्णपणे पालन करण्याची सूचना, निर्देश दिलेले आहेत. भारतानेदेखील परदेशी गुंतवणुकदारांच्या कायदेशीर अधिकारांचा सन्मान करायला हवा. यामध्ये चिनी गुंतवणूकदार असून भेदभाव करता कामा नये असेही त्यांनी म्हटले.

वाचा: भारतानंतर अमेरिकेचाही चीनला दणका; ‘या’ कंपन्यांवर बंदी

वाचा: केंद्र सरकारची चिनी अॅप्सवर बंदी; चीनचा थयथयाट सुरू

केंद्र सरकारच्या या निर्णयाचे पडसाद चीनमध्येही उमटले आहेत. चीनच्या सरकारी माध्यमांनी भारत सरकारच्या या निर्णयाविरोधात थयथयाट सुरू केला आहे. भारताचा हा निर्णय म्हणजे अमेरिकन सरकारची नक्कल करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने म्हटले की, भारताने घेतलेला हा निर्णय म्हणजे अमेरिकेच्याजवळ जाण्याचा प्रयत्न आहे. अमेरिकेनेदेखील राष्ट्रवादाच्या आडून चिनी वस्तूंवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या निर्णयामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असल्याचे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.

वाचा: ५९ अॅपच्या बंदीपूर्वीच चीनचाही भारताविरोधात मोठा निर्णय

वाचा: चीनला अद्दल घडवा! अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर

दरम्यान, चीनमध्ये भारतीय ई-पेपर आणि न्यूज वेबसाइट बंद करण्यात आल्या आहेत. अनेक युझर्स भारतातील बातम्या वाचू शकत नाहीत. तर अनेकांना फक्त व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणजेच व्हीपीएनसह वेबसाइट वाचता येत आहेत. दुसरीकडे चीनच्या वेबसाइट आणि वृत्तपत्र भारतात वाचले जाऊ शकतात. पण चीनमधील भारतीयांना व्हीपीएनशिवाय पर्याय नाही. सर्वात जास्त ऑनलाइन सेन्सरशिप असणाऱ्या देशांमध्ये चीनचा समावेश होतो. देशांतर्गत इंटरनेटवर चीनची मोठ्या प्रमाणात नजर असतेSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

New Inflation Index For Employees Will Easy To Calculate Dearness Allowance – नोकरदारांसाठी नवा महागाई निर्देशांक; महागाई भत्त्याची सवलत ठरवणे होणार सोपे

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : औद्योगिक आस्थापनांतून, कारखान्यांतून काम करणाऱ्या नोकरदारांसाठी केंद्र सरकारने गुरुवारी नवा महागाई निर्देशांक सुरू केला. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता...

Hingulambika Devi Temple: साडेतीनशे वर्षांचा इतिहास; देवीचे मूळ पाकिस्तानात – three and a half hundred years of history of the hingulambika devi temple

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादशहराच्या मध्यवस्तीतील म्हणजे रंगारगल्लीतील श्री हिंगुलांबिका देवीच्या मंदिराला ३५० वर्षांचा इतिहास आहे. यंदा करोना परिस्थितीमुळे प्रथमच देवीची मिरवणूक निघणार नाही.नवरात्रात...

Thane: Thane: कामाचे पैसे न दिल्याने प्लंबरने केली कंत्राटदाराची हत्या – man killed contractor at ghodbunder in thane

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : कामाचे १२ हजार रुपये न दिल्याने प्लंबरने कंत्राटदाराची हत्या केल्याची घटना ठाण्यातील घोडबंदर भागात घडली. हत्येनंतर परराज्यात पळून...

Recent Comments