Home विदेश China Pakistan: पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनचा वीजप्रकल्प; भारताचा विरोध - china to construct...

China Pakistan: पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनचा वीजप्रकल्प; भारताचा विरोध – china to construct power project in pok under cpec


इस्लामाबाद: चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरअंतर्गत (सीपीईसी) पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीन एक हजार १२४ मेगावॅटचा प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे. या प्रकल्पाला भारताने विरोध केला आहे. या विरोधानंतरही चीन-पाकिस्तानकडून या प्रकल्पावर काम सुरू आहे.

ऊर्जामंत्री ओमर आयूब यांच्या अध्यक्षतेखालील ‘खासगी ऊर्जा आणि पायाभूत सुविधा मंडळा’च्या (पीपीआयबी) १२७व्या बैठकीत या कोहला जलविद्युत प्रकल्पाचा तपशील सादर करण्यात आला. चीनचे थ्री गॉर्जेस कॉर्पोरेशन, पाकव्याप्क काश्मीरमधील अधिकारी आणि ‘पीपीआयबी’ यांच्यात त्रिपक्षीय कराराला अंतिम रूप देण्यात आले असल्याची माहिती देण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली असल्याचे ‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.

झेलम नदीकिनारी उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पातून पाकिस्तानी ग्राहकांना माफक दरात वर्षाला पाच अब्ज युनिट वीज पुरवण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी २.४ अब्ज डॉलर खर्च करण्यात येणार असून, या भागातील ‘स्वतंत्र ऊर्जा उत्पादना’तील (आयपीपी) ही सर्वांत मोठी गुंतवणूक असल्याचे या वृत्तपत्राने नमूद केले आहे.

वाचा: सीमेवरील तणावानंतर चीनची भारताला ही ‘ऑफर’!
वाचा: चीनने त्यांचं सैन्य भारताच्या उत्तरेकडे वळवलंय; अमेरिकेचा दावा
चीनला अरबी समुद्रात मिळणार प्रवेश

तीन हजार किमीच्या ‘सीपीईसी’ अंतर्गत चीन आणि पाकिस्तानला रेल्वे, रस्तेमार्ग, पाइपलाइन आणि ऑप्टिकल केबल फायबर नेटवर्कने जोडण्याचा उद्देश आहे. चीनचा झिनजियांग प्रांत आणि पाकिस्तानचे ग्वादर बंदर यांना जोडणाऱ्या या पट्ट्यामुळे चीनला अरबी समुद्रात प्रवेश मिळणार आहे. ‘सीपीईसी’ पाकव्याप्त काश्मीरमधून जात असून, भारताने याबाबत चीनला आपला विरोध याआधीच कळवला आहे. दरम्यान, चीनची सरकारी कंपनी आणि पाकिस्तान लष्कराच्या व्यावसायिक विभागामध्ये डायमर-भाषा धरणाच्या उभारणीसाठी ४४२ अब्ज रुपयांच्या करारावर स्वाक्षरी झाली आहे. गेल्याच महिन्यात गिलगिट-बाल्टिस्तानमधील या धरणाच्या बांधकामाप्रश्नी भारताने पाकिस्तानला इशारा देत अवैधरित्या ताब्यात असलेल्या प्रांतांमध्ये असे प्रकल्प राबवणे योग्य नसल्याचे म्हटले होते.

आणखी वाचा:
करोनाला दूर ठेवण्यासाठी करा ‘हे’ तीन उपाय!
चीनची ‘सावकारी’! १५० देशांना ५ ट्रिलियन डॉलरचे कर्जSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aditya Roy Kapur: एका कॉलवर आदित्य रॉय कपूरच्या मदतीला धावून आले रामदास आणि सत्यजित पाध्ये – Aditya Roy Kapur Becomes Bollywoods First Actor Get...

मुंबई- अनुराग बसू यांनी दिग्दर्शित केलेला 'लुडो' हा चित्रपट एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता आदित्य रॉय-कपूरनं या चित्रपटात एका शब्दभ्रमकाराची भूमिका...

सटाण्यातील व्यावसायिक माखिजा यांची आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा, सटाणा सटाणा शहरातील बागलाण ब्रॅण्डी हाऊसचे संचालक (वय ६२) यांनी रविवारी सायंकाळी लोहणेर येथील पुलावरून गिरणा नदीपात्रात उडी मारून ...

व्यापारी सासूरवाडीला गेला होता, फ्लॅटवर परतल्यानंतर दृश्य बघून हादरलाच

म. टा. प्रतिनिधी, : सासूरवाडीला गेलेल्या कापड व्यवसायिकाचे घर फोडून चोराने दोन लाखांची रोकड आणि दोन तोळ्याचे दागिने लांबविल्याची घटना सोमवारी (२३ नोव्हेंबर)...

Recent Comments