Home विदेश china threatens india: चीनची आता आर्थिक युद्धाची भारताला धमकी; अॅप बंदी झोंबली...

china threatens india: चीनची आता आर्थिक युद्धाची भारताला धमकी; अॅप बंदी झोंबली – ladakh face off china threatens india after banned apps


पेइचिंगः पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय जवानांवर चिनी सैनिकांनी विश्वासघाताने हल्ला केला. यानंतर दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात १५ जूनला भारताचे २० जवान शहीद झाले. या घटनेची गंभीर दखल भारताने घेतलीय. भारताने सोमवारी ५९ चिनी अॅपवर बंदी घालत चीनला झटका दिला आहे. यावर चीन खवळला आहे. चीनच्या सरकारी मीडियाने भारताला धमकावण्यास सुरुवात केलं असून भारताविरोधात आर्थिक युद्ध पुकारण्याचा इशारा दिला आहे. याचे परिणाम अतिशय वाईट होतील, असं चीनच्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रातून धमकावण्यात आलं आहे.

चिनी नागरिकांनी भारतीय वस्तुंवर बहिष्कार टाकला तर एकही भारतीय उत्पादन चीनमध्ये विकले जाणार नाही. यामुळे भारतीयांनी राष्ट्रवादाशिवाय महत्त्वाच्या असलेल्या इतर गोष्टींचीही तुम्हाला गरज आहे, असं ग्लोबल टाइम्सचे संपादक हू शिजीन यांनी ट्विट करून म्हटलंय. याशिवाय वेगवेगळ्या लेखातून यामुळे होणाऱ्या भारताच्या नुकसानीचाही इशारा दिला.

सर्वाधिक पसंतीच्या मार्केटमध्ये भारत

एक वर्षापूर्वी भारत चिनी गुंतवणुकदारांसाठी सर्वाधिक पसंतीचे मार्केट होते. ‘भावी वन बिलियन मार्केट’ असे संबोधले जात होते. चीन मोबाइल इंटरनेटसाठी महत्वाचे ठरत होते. २०१७ ते २०२० मध्ये भारतात चीनमधून १० बिलियन डॉलरची गुंतवणूक केली गेली होती. पण आधी करोना व्हायरस आणि आता सीमेवरील तणावाने संबंध बिघडत गेले, असं ग्लोबल टाइम्सने म्हटलंय.

मोदी चीनवर बोलायला विसरले वाटतं, काँग्रेसचा पंतप्रधानांवर पुन्हा निशाणा

PM मोदींना चीनवर बोलायचं होतं, चण्यावर बोललं गेलं अन् ईदही विसरले; ओवैसींचा टोला

अॅपवरील बंदीचा फटका बसेल, पण…

भारताने चिनी अॅपवर बंदी घातल्याने संबंधित कंपन्यांवर याचा परिणाम नक्की होणार आहे. पण चीनच्या अर्थव्यवस्थेला धक्का देऊ शकेल इतकी शक्ती भारतात नाहीए, असं ग्लोबल टाइम्सने लिहिलंय.

भारताने जो निर्णय घेतला आहे त्याने चिनी गुंतवणूक आणि व्यापाऱ्यांचा विश्वासाला तडा गेला आहे. करोना व्हायरसच्या संकटामुळे सामना करत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला याचे परिणाम दीर्घकाळ भोगावे लागतील. अशा स्थितीत भारत सरकार देशातील राष्ट्रवादाला आणखी प्रत्साहन देत असेल तर डोकलामपेक्षाही मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना भारताला करावा लागेल. यामुळे भारत सरकार परिस्थितीचे वास्तव समजेल आणि विद्यमान संकटाचे रुपांतर धगधगत्या आगीत होण्यापासून रोखेल अशी आपेक्षा आहे, असं म्हणत चीनने धमकावलं आहे. डोकलाम वादावेळी भारताचे आर्थिक नुकसान झाले नव्हते. कारण त्यावेळी द्विपक्षीय संबंध लगेचच सुधारण्यात आले होते. पण द्विपक्षीय संबंध अधिक बिघडले तर भारताला आर्थिक साठमारीचा सामना करावा लागेल, अशी धमकीही चीनने दिलीय.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Petrol Rate today: पेट्रोल-डिझेल ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधन दर – Petrol Diesel Rate Today

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज मंगळवारी सलग २५ व्या दिवशी इंधन दर जैसे थेच ठेवले. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोल ८७.७४ रुपये आणि डिझेल...

समतोल नेतृत्व : वावेल रामकलावन

'ना कुणी पराभूत झालाय, ना कुणी विजयी. हा आपल्या देशाचा विजय आहे. आपल्या मातृभूमीतील एखाद्याचे योगदान संपुष्टात आणणे, हा एखाद्या निवडणुकीचा अर्थ असू...

shinco smart tv offers: ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करा फक्त ८ हजार ९९९ रुपयांत – shinco announces amazing discounts and offers on its...

नवी दिल्लीः फेस्टिवल सीजनमध्ये तुम्हाला जर इंडियन ब्रँडचा स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर शिंको कंपनीने तुमच्यासाठी खास अॅमेझॉनवर बेस्ट डील आणली आहे....

Recent Comments