इस्रायलमधील चीनच्या दूतावासाने याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. इस्रायलमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या राजदूतांच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृत्यू नेमका कोणत्या कारणांमुळे झाला, याचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. मृतदेहावर कोणत्याही जखमा आढळल्या नसल्याचे इस्रायलच्या आर्मी रेडिओने म्हटले आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने वेई यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.
वाचा: ‘हे’ औषध ठरतेय करोनाच्या संसर्गावर परिणामकारक!
चिनी राजदूत डू वेई यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डू वेई यांनी फेब्रुवारी महिन्यातच इस्रायलमधील चीनचे राजदूत म्हणून पदभार स्विकारला होता. याआधी ते युक्रेनमध्ये चीनचे राजदूत होते.
आणखी वाचा:
‘रेड लाइट’ परिसर बंद ठेवल्यास नवीन रुग्ण संख्येत ७२ टक्क्यांनी घट!
पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून हवाई तळाची उभारणी!