Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल chinese app ban: चीनी अॅप्सवर बंदी, चायनीज फोन सुरूच राहणार - chinese...

chinese app ban: चीनी अॅप्सवर बंदी, चायनीज फोन सुरूच राहणार – chinese app ban: even if the app is banned, chinese phones will continue to run as before


नवी दिल्लीः शाओमी, ओप्पो, विवो आणि रियलमी यासारख्या कंपन्यांचे स्मार्टफोन्स आधी प्रमाणेच काम करणार आहेत. चायनीज अॅप्स बंद करण्याच्या निर्णयामुळे या फोन्सवर कुठलाच परिणाम होणार नाही. केंद्र सरकारने सोमवारी ५९ चीनी अॅप्सवर भारतात बंदी घातली आहे. त्यामुळे या अॅप्सनंतर चायनीज फोनवर सुद्धा याचा परिणाम पाहायला मिळेल, असे बोलले जात आहे. सध्या भारतात या चिनी कंपन्यांचे मोठे मार्केट भारतात आहे. शाओमीचे दोन अॅप्सचा बंदी घातलेल्या यादीत समावेश आहे.

वाचाः फेसबुकचा पासवर्ड तात्काळ बदला, या २५ अॅप्सपासून मोठा धोका

चीन आणि भारत यांच्यात सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर चायनीज उत्पादनावर भारतात बंदी घालण्याची मागणी करण्यात येत होती. सरकारने सोमवारी एक निर्णय घेत चीनशी संबंधित Tiktok, CamScanner आणि UCBrowser यासह ५९ अॅप्सवर बंदी घातली आहे. टिकटॉक युजर्संनी चायनीज फोन यासाठी खरेदी केले होते. या फोनमध्ये चांगले व्हिडिओ बनवता येतात. तसेच यात चांगले फीचर्स असतात.

वाचाः रेडमीच्या या फोनचा आज सेल, जबरदस्त ऑफर्स


फोनवर कोणताही परिणाम नाही

केंद्र सरकारकडून चिनी अॅप्सवर बंदी घातली असली तरी याचा परिणाम फोनच्या विक्रीवर होणार नाही. प्रतिस्पर्धी कंपन्याही मानायला तयार आहे की, फोनच्या कंपोनेंट्स चीनहून येतात. सध्या चायनीज फोन्सवर या बंदीचा काहीही परिणाम होणार नाही. ते आधीप्रमाणेच काम करणार आहे. फोनच्या मॅन्यूफॅक्चरिंगचे म्हणणे आहे की, याचा थेट फरक डिव्हाइसच्या फंक्शनॅलिटीवर पडणार नाही. कस्टमर्स नवीन अॅप्सवर सहज स्विच करु शकतील.

वाचाः TikTok प्ले स्टोरवरून आउट, हळूहळू गायब होताहेत अॅप

फोनमध्ये नाही मिळणार प्री इन्स्टॉल अॅप्स
काउंटरपॉइंटचे रिसर्च डायरेक्टर नील शाह यांनी म्हटले की, यात कोणतीही शंका नाही की, सध्या मार्केटमध्ये निगेटिव्ह सेंटिमेंट आहे. लोक चायनीज प्रोडक्ट खरेदी करण्याआधी विचार करतील. सध्या सॅमसंग आणि अॅपल यासारख्या नॉन चायनीज ब्रँड्सला आधीच्या तुलनेत जास्त मागणी मिळू शकते. तसेच चायनीज फोन्समध्ये अनेक अॅप्स प्री इन्स्टॉल मिळत होते. आता हा ट्रेंड संपला जाईल.

वाचाः फोनमध्ये सुरू असलेले चायनीज अॅप्स होणार बंद

वाचाः फोनमधून हटवा चीनी अॅप, असे निवडा भारतीय अॅप

वाचाः शाओमी ५०० रुपयांत बदलतेय स्मार्टफोनची बॅटरीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

कर्जाला विरोध, म्हणजे असंमजसपणा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक भाजपच्या विकासकामांसाठीच्या तीनशे कोटींच्या कर्जयोजनाला विरोध करणाऱ्या शिवसेनेवर महापौर यांनी जोरदार पलटवार केला आहे. आपल्या प्रभागात कामे करायची...

aus vs ind 4th test: AUS vs IND 4th Test day 3: भारताच्या शेपटाने ऑस्ट्रेलियाला रडवले, सुंदर-ठाकूर यांची विक्रमी भागिदारी – aus vs ind...

ब्रिस्बेन:aus vs ind 4th test day 3 highlights भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात...

marati movies 2021: मराठी चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार नवी केमेस्ट्री; ‘या’ जोड्या पहिल्यादाच दिसणार एकत्र – upcoming fresh pairs in marathi cinema you’ll get to...

मुंबई टाइम्स टीमगेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत मोजकेच सिनेमे प्रदर्शित झाले. पुढे मार्चच्या मध्यानंतर लॉकडाउनच्या दिवसात एकही सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही. ओटीटीवर देखील...

डोंबिवलीची मुले बनवणार उपग्रह!

म. टा. वृत्तसेवा कल्याण : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन आणि ''च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पेस रिसर्च पेलोड क्युब्ज...

Recent Comments