Home शहरं मुंबई chinese app ban: chinese app ban : चिनी अॅप्सवरील बंदीसाठी जवानांच्या बलिदानाची...

chinese app ban: chinese app ban : चिनी अॅप्सवरील बंदीसाठी जवानांच्या बलिदानाची वाट पाहात होता का?: राऊत – shivsena leader sanjay raut slams bjp over chinese app ban


मुंबई: केंद्र सरकारने चिनी अॅप्सवर घातलेल्या बंदीवरून शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. चिनी अॅप्सपासून धोका आहे हे माहीत होते तर त्या कंपन्या सुरू का होत्या? चिनी अॅप्सवरील बंदीसाठी जवानांच्या बलिदानांची वाट पाहात होता का? २० जवानांचे बलिदान झाले नसते तर या कंपन्या अशाच सुरू राहिल्या असत्या, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाना साधला.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यामांशी बोलताना काही प्रश्नच उपस्थित करत केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. भारत-चीन सीमावादावर राजकारण होता कामा नये, हा राजकीय धोरणाचा भाग आहे, असं सांगतानाच चीनचं आर्थिक कंबरडं मोडायलाच पाहिजे. संपूर्ण देशाचीही तिच भावना आहे. चीनमध्ये आपण मोठी गुंतवणूक करतो. त्यांची आपल्याकडे गुंतवणूक होते. त्याबाबतचं धोरण ठरवलं पाहिजे. नाही तर पाकिस्तान सोबत असं धोरण ठेवतो, तसं होता कामा नये, असा चिमटाही त्यांनी काढला. चिनी अॅप्सवर बंदी घातली त्याला आमचा विरोध नाही. या बंदीचं आम्ही स्वागत करतो. पण या अॅप्सपासून धोका आहे, हे माहीत असतानाही त्यावर बंदी का घातली गेली नाही? असा सवाल करतानाच तुमची गोडीगुलाबी झाल्यावर हा धोका नाही, गुलाबजाम होता असं होवू नये, असा टोला राऊत यांनी लगावला. तसेच केंद्र सरकारने चीन सोबत लढावं विरोधकांशी लढू नये. ही लढाई चीनसोबत व्हावी, काँग्रेस-भाजप अशी लढावी होऊ नये, असा टोलाही त्यांनी हाणला.

पंतप्रधान मोदींचे देशाला उद्देशून संबोधन, नागरिकांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी हे विचारत असलेले प्रश्न योग्यच असल्याचं राऊत म्हणाले. राहुल गांधी काही प्रश्न विचारत असतील तर त्याची उत्तरे मिळाली पाहिजेत. राहुल गांधींना ती उत्तर दिलं पाहिजे. देशाला ती उत्तरं मिळाली पाहिजे. केंद्र सरकारने स्वत: पुढे येऊ सर्व शंका दूर केल्या पाहिजे. राहुल यांचे प्रश्न जर चुकीचे असतील तर सरकारने त्याचं योग्य उत्तर दिलं पाहिजे. राष्ट्रभक्ती ही कोण्या एका पक्षाची मक्तेदारी नाहीये. देशातील १३० कोटी जनता देशभक्त आहे, त्यामुळे कोणी जर काही प्रश्न विचारत असेल तर सरकारने त्याला उत्तरं दिलीच पाहिजे, असंही ते म्हणाले.

टिकटॉकने पीएम केअरला ३० कोटी दिले; हा क्रांतीचा भाग होता का?: काँग्रेस

TikTok प्ले स्टोरवरून आउट, हळूहळू गायब होताहेत अॅपSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Gaya: अनैतिक संबंधांत अडथळा ठरत होता पती, हैवान पत्नीने त्याची… – bihar wife killes husband over illicit affair

गया: बिहारच्या गया येथे एका महिलेने अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीची निर्घृण हत्या केली. मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. महिलेने माहेरच्यांच्या...

अन् अपघाताने बालविवाहाचे पितळ उघडे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक लॉकडाउन काळात विवाह सोहळ्याचे आयोजन हे आर्थिक दृष्टिकोनातून वधू पक्षासाठी लाभदायी ठरले. कमीत कमी खर्च आणि नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाह...

Recent Comments