Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल chinese apps ban: चिनी कम, भारतीय जादा, टिकटॉकला हे आहेत पर्याय -...

chinese apps ban: चिनी कम, भारतीय जादा, टिकटॉकला हे आहेत पर्याय – chinese apps banned in india: you can try these indian alternatives instead


नीरज पंडित

उद्योगक्षेत्रापासून मोबाइल अॅप्सपर्यंत प्रत्येक क्षेत्रात चीननं भारतीय ग्राहकांना आकर्षित केलं होतं. चीनमधून आलेल्या करोना विषाणूनं माजवलेला हाहाकार आणि सध्या सीमाभागात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं चीनच्या ५९ अॅप्सवर बंदी जाहीर केली. यात तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘टिक टॉक’ अॅपचाही समावेश आहे. हे अॅप गुगल प्लेवरून तातडीने काढून टाकण्यात आलं आहे. मात्र याबाबत आमची सरकारशी बोलणी सुरू असल्याचं ‘टिक टॉक’तर्फे सांगण्यात आलं. याचबरोबर इतर अॅप्सवरही बंदी आणण्यात आलीय. या अॅपमुळे पर्यायी भारतीय अॅप्सना मागणी वाढली आहे. यामुळे अवघ्या एका दिवसांत या अॅप्सच्या डाउनलोडिंगमध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचं समोर आलयं. देशातील सायबर सुरक्षा लक्षात घेता सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं भारतीय अॅप कंपन्यांनी स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे भारतीय स्टार्टअप्सना अधिक बळ मिळेल, असं मत शेअर चॅटचे पब्लिक पॉलिसी डायरेक्टर बर्गेस मालु यांनी व्यक्त केलं.

टिक टॉकर्सची नाराजी

या निर्णयावर देशातील काही टिक टॉकर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. अर्थात, अॅप बॅन करू नका असं कुणी म्हणत नसलं, तरी अॅप बॅनच्या निर्णयाचं स्वागत करताना, या अॅपला पर्याय द्यावा, असं टिक टॉकर्सचे म्हणणं आहे.

बॅन झालेल्या चिनी अॅप्सना भारतीय आणि भारतात ग्राह्य असलेल्या अॅप्सचे काय पर्याय आहेत त्यावर एक नजर

टिक टॉक, हॅलो, बिक लाइब, विगो व्हिडीओ, व्हमेट, यू व्हिडीओ आणि केवाई या अॅप्सना

शेअर चॅट, मित्रो, बोलो इंडिया, रोपोसो, डबस्मॅश या अॅप्सचा पर्याय आहे.

नोटेबली, झी५ हे अॅप लवकरच शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म आणणार आहेत.

बैडू ट्रान्सलेट या अॅपला

गुगल ट्रान्सलेट आणि हाय ट्रान्सलेट असे पर्याय आहेत.

वुई मीट, वुई चॅट या अॅप्सना

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप

हॅगो प्ले विथ न्यू फ्रेंड या अॅपला हाउस पार्टी हे भारतीय अॅप पर्याय आहे.

शेअर इट, झेंडर, ईएस फाइल एक्स्प्लोरर या फाइल या अॅप्सना

फाइल्स गो, सेंड एनीव्हेअर, गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स याचबरोबर शेअर ऑल, जिओ स्विच, स्मार्ट शेअर

यूसी ब्राऊझर, डीसी ब्राऊझर, एपीयूएस ब्राऊझर या अॅप्सना

गुगल क्रोम, मॉझिला फायरफॉक्स, मायक्रोसॉफ्ट एज, ओपेरा, जिओ ब्राऊझर

मोबाइल लिजंड्स या अॅपला पर्याय

फोर्टिन बॅटल रॉयल, लिजेंड्स ऑफ लिजेंड्स, पबजी

बिंडु मॅप या अॅपला

गुगल मॅप, अॅपल मॅप्स, मॅप माय इंडिया असे पर्याय आहेत.

शाईन, क्लब फॅक्ट्री, रोमो या अॅप्सना

मिंत्रा, फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, लाइमरोड यासारखे अॅप्स पर्याय आहेत.

कॅमस्कॅपर या अॅपला

अडोबे स्कॅन, मायक्रोसॉफ्ट ऑफिस लेन्स, फोटो स्कॅन, फोटो स्कॅन, टॅपस्कॅनर.

यूकॅम मेकअप, सेल्फी सिटी, मीटू या अॅप्सना

बी ६१२ ब्युटी अॅण्ड फिल्टर कॅमेरा हे पर्याय आहेत.

डीयू बॅटरी सेव्हर या अॅपला

बॅटरी सेव्हर आणि चार्ज ऑप्टिमायझर हे पर्याय आहेत.

इएस फाइल एक्स्प्लोरर या अॅपला

क्लीन मास्टर, चीता मोबाइल, व्हायरस क्लिनर

न्यूजडॉग, यूसी न्यूज, क्यूक्यू न्यूजफीड या अॅपला

गुगल यूज, अॅपल न्यूज, इनशॉर्टSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments