Home विदेश Chinese apps banned होय...टिकटॉक बंदीमुळे आर्थिक नुकसान; चीनची कबुली - Tiktok Parent...

Chinese apps banned होय…टिकटॉक बंदीमुळे आर्थिक नुकसान; चीनची कबुली – Tiktok Parent Company Bytedance Could Suffer Billion Dollar Loss Said China Media


बीजिंग: भारत सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी अॅप्सवर बंदी आणल्यानंतर चीनमध्ये सरकारी माध्यमांनी थयथयाट सुरू केला होता. अॅप्सवर बंदी आणल्यामुळे भारताचेच आर्थिक नुकसान होणार असल्याची टिमकी वाजवणाऱ्या चीनचा सूर नरमला आहे. अॅप्स बंदीमुळे आर्थिक नुकसान होणार असल्याचे चीनने म्हटले आहे.

चीन सरकारचे वृत्तपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’ने याची कबुली दिली आहे. भारतात बंदी आणलेल्या अॅप्स कंपनीमध्ये बाइट डान्स या कंपनीचा समावेश असून टिकटॉक, हॅलोसह इतर काही अॅप्स या कंपनीच्या मालकीची आहेत. टिकटॉकने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. टिकटॉकने फेसबुकलादेखील मागे टाकले होते. आता टिकटॉकवरील बंदीमुळे बाइट डान्स कंपनीला आर्थिक नुकसान सहन करावे लागणार असल्याचे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. भारताच्या अॅप्स बंदीमुळे बाइट डान्सला तब्बल ६ अब्ज डॉलरचे नुकसान होणार असल्याचे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. त्यामुळे अॅप्स बंदीमुळे चिनी कंपन्यांना मोठा फटका बसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

वाचा: भारतानंतर अमेरिकेचाही चीनला दणका; ‘या’ कंपन्यांवर बंदी

भारताने अॅप्स बंदीचा निर्णय घेतल्यानंतर ग्लोबल टाइम्सने त्यावर कडाडून टीका केली होती. अॅप्स बंदीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असल्याचे ग्लोबल टाइम्सने म्हटले होते. चिनी कंपन्यांसाठी आणि गुंतवणुकदारांसाठी भारत ही मोठी बाजारपेठ असल्याचे ग्लोबल टाइम्सने मान्य केले आहे. मागील काही काळापासून चिनी गुंतवणुकदारांचे भारतीय बाजारपेठेवर लक्ष होते. त्यामुळे केंद्र सरकारने बंदी आणल्यामुळे या गुंतवणुकदारांना, कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची चिन्हे आहेत.

वाचा: चीनची चहुबाजूने कोंडी!; अमेरिका, ब्रिटनसह २७ देश एकवटले

वाचा: भारताचा अॅप बंदीचा दणका; चीनला आठवला कायदा!
भारताने चिनी कंपन्यांवर बंदी घातल्यामुळे चीन धास्तवला असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. भारताने घेतलेल्या या निर्णयाचे अनुकरण इतर देशही करतील अशी चीनला धास्ती आहे. अमेरिकन कंपनी गुगल आणि फेसबुकसाठी भारत आणि दक्षिण-पूर्व आशिया देश मोठी बाजारपेठ होती. या देशांमध्ये चीनच्या कंपन्यांनी या अमेरिकन कंपन्यांच्या वर्चस्वाला धक्का दिला. एका अभ्यासानुसार, भारतात २०१९ मध्ये टॉप २०० अॅप्समध्ये ३८ टक्के अॅप्स चीनचे होते.

दरम्यान, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी अॅप्स बंदीवर भूमिका मांडली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी सांगितले की, या प्रकरणाबाबत चीन चिंतेत असून याबाबतची सर्व माहिती जमा करण्यात येत आहे. याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. चीन सरकारने कायमच आपल्या देशातील कंपन्यांना अन्य देशांमधील कायद्यांचे पूर्णपणे पालन करण्याची सूचना, निर्देश दिलेले आहेत. भारतानेदेखील परदेशी गुंतवणुकदारांच्या कायदेशीर अधिकारांचा सन्मान करायला हवा.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in Nashik: coronavirus – ४७७ रुग्ण बरे, ४१९ जणांची भर – nashik reported 491 new corona cases and 4 deaths in yesterday

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिककरोना रुग्णवाढीमध्ये मिळणारा दिलासा कायम असून, जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात ४७७ रुग्ण बरे झाले, तर ४१९ नव्या रुग्णांची भर पडली....

Pune Atal Bus Service: पुणेकरांसाठी खूषखबर! पाच किलोमीटरचा प्रवास आता फक्त ५ रुपयांत – bjp leader chandrakant patil inaugurates atal bus service in pune

पुणे: 'पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या 'अटल' बस सेवेला आज सुरुवात झाली. या अंतर्गत पुणेकरांना पाच किलोमीटरपर्यंतचा प्रवास अवघ्या ५ रुपयांत करता येणार आहे....

cm uddhav thackeray: शेतकऱ्यांसाठी हवेत २४०० कोटी – marathwada farmers needs 2400 crore from package cm uddhav thackeray declared yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादपावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दहा हजार कोटी रुपयांचे 'पॅकेज' जाहीर केले असून, त्यातून मराठवाड्यासाठी २४०० कोटी रुपये...

Recent Comments