Home देश पैसा पैसा Chinese exports worth usd 17 billion impact: भारतीयांना ठरवले तर चीनला बसू...

Chinese exports worth usd 17 billion impact: भारतीयांना ठरवले तर चीनला बसू शकतो १७ अब्ज डॉलरचा झटका! – boycott chinese goods may impact chinese exports worth usd 17 billion


नवी दिल्ली: पूर्व लडाखमध्ये झालेल्या लष्करी कृत्यावर संपूर्ण देशात चीनबद्दल राग व्यक्त केला जात आहे. सर्व जण चीनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. अनेक उद्योजकांनी देखील इ-कॉमर्स कंपन्यांनी चीनमध्ये तयार झालेल्या वस्तूंची विक्री करण्याची बंदी घालावी अशी मागणी केली आहे.

वाचा- अंबानींची वचनपूर्ती ; ‘रिलायन्स’वरील कर्जाबाबत केली मोठी घोषणा

चीनमधून भारतात होणारी एकूण आयातीमधील रिटेल ट्रेडर्स जवळपास १७ अब्ज डॉलर इतके आहे. यात अधिक तर खेळणी, घरगुती वस्तू, मोबाइल, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिक वस्तू, आणि कॅस्मॅटिक उत्पादनांचा समावेश आहे. जर या वस्तूची आयत बंद झाली तर संबंधित वस्तूंची भारतात निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना फायदा होईल.

दिला जात आहे हा सल्ला

फेडरेशन ऑफ ऑल इंडिया संघटनेचे महासचिव व्ही के बन्सल म्हणाले, आम्ही आमच्या सदस्य असलेल्या व्यापाऱ्यांना त्यांच्याकडील चीनी वस्तूंचा स्टॉक संपवण्यास तसेच त्याच बरोबर यापुढे चीनी वस्तू मागवू नका, सांगितले आहे. आम्ही सरकारला देखील ही विनंती केली आहे की, इ कॉमर्स कंपन्यांना चीनी वस्तू विकण्यापासून रोखण्यात यावे.

वाचा- करोना संकटात झाले मालामाल; ९ आठवड्यात १.१५ लाख कोटी!

कनफेडरेशन ऑफ वेस्ट बंगाल ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुशील पोद्दार यांनी देखील संघटनेने चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्याचे सांगितले. देश पातळीवर द कनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) देखील असाच निर्णय घेतला आहे. ‘भारतीय वस्तू-आमचा अभिमान’ अशी एक मोहिम या संघटनेने सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा- फक्त शंभर रुपयांची गुंतवणूक आणि मिळवा ५ लाख!

CAITने चीनी उत्पादनांची एक यादीच प्रसिद्ध केली आहे. यात जवळपास ३ हजार वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. याच बरोबर CAITने सेलिब्रिटींना पत्र लिहून चीनी वस्तूच्या जाहिराती करणे बंद करावे अशी विनंती केली आहे.

वाचा- चीनचा बाजारपेठेवर कब्जा; बहिष्काराची गोष्टी सोपी नाही!

दरम्यान, चिनी वस्तुंच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करून स्वदेशी उत्पादनांच्या निर्मितीवर भर देण्याच्या योजनेवर सरकारेच काम सुरू आहे. भारतात होणाऱ्या आयातीपैकी १४ टक्के आयात ही चीनमधून केली जाते. यात मोबाइल, टेलिकॉम, ऊर्जा, प्लास्टिक खेळणी आणि औषध निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याचा समावेश आहे. चीनच्या निकृष्ट दर्जाच्या मालाच्या आयातीवर सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. तांत्रिक नियम, सुरक्षा आणि गुणवत्तेच्या निकषांचे कठोर पालन आता चिनी मालासाठी केले जाईल. सरकारकडे ३७० वस्तुंची यादी आहे. जीवनावश्यक नसलेल्या अशा या वस्तुंची आयात मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात येणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Varun Gandhi: मदत मागणाऱ्यावर वरुण गांधी खवळले!; म्हणाले, ‘मी काय तुमचा नोकर नाही’ – bjp pilibhit mp varun gandhi viral audio illegal liquor case...

पिलीभीतः उत्तर प्रदेशमधील पिलीभीत येथील भाजप खासदार वरुण गांधी ( varun gandhi ) यांचा एक कथित ऑडिओ व्हायरल झाला आहे. या कथित व्हायरल...

Recent Comments