Home विदेश Chinese GDP: चिनी मालावर बहिष्कार; चीनने आता भारताला दिले हे आव्हान -...

Chinese GDP: चिनी मालावर बहिष्कार; चीनने आता भारताला दिले हे आव्हान – boycott chinese products china gave challenge india


पेइचिंगः लडाखमध्ये विश्वासघात करून भारतीय जवानांवर हल्ला करणाऱ्या चीनचा चिनी वस्तुंवरील बहिष्काराने मिर्ची झोंबली आहे. अर्थव्यवस्थेवर नकारात्म परिणाम होण्याच्या आशंकेतून जळफळाट झालेल्या चीनने आता भारताला जीडीपीची धमकी दिली आहे. भारताच्या तुलनेत चीनची जीडीपी पाच पट अधिक आहे, असं ‘ग्लोबल टाइम्स’ या आपल्या मुखपत्रातून चीनने म्हटलंय. भारत ज्या वस्तू चीनमधून आयात करतो त्या वस्तुंचे उत्पादन करू शकत नाही, असे आव्हानही चीनने दिले आहे.

हरभजन सिंग आणि लष्करातील मेजरचे नाव घेतले

क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि लष्कराचे निवृत्त अधिकारी मेजर रणजीत सिंग यांनी चिनी मालावर बहिष्काराचे आवाहन केलं आहे. याची दखल ‘ग्लोबल टाइम्स’ने घेतलीय. चीनमधील आयातीवर भारताकडून अनेक प्रकारचे निर्बंध लावले जाणार आहेत. यात चीनच्या ३०० उत्पादनांवरील आयात शुल्कात मोठी वाढ करण्यात येणार आहे. भारताची ही दीर्घकालन योजना असू शकते. पण काही माध्यमांकडून या योजनांचा उपयोग हा भारतात चीन विरोधी भावना भडकवण्यासाठी केला जातोय, असं चीनने म्हटलंय.

बहिष्कारानंतरही चीनसोबतचा व्यापार वाढला

भारतातील राष्ट्रवादी संघटनांनी आणि शक्तींनी चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करत आहेत. पण वास्तवर हा शक्ती दरवर्षी चिनी मालावर बहिष्काराचे आवाहन करत असतात. तरीही चीन-भारत दरम्यानचा व्यापार हा सतत वाढत आहे. भारत चीनमधून अधिकाधिक वस्तुंची आयात करत आहे. यामुळे दरवर्षी भारताला चीनसोबतच्या व्यापारातून अब्जावधी रुपयांच्या तोट्याचा सामना करावा लागतोय.

भारताला चीनने दिले हे आव्हान

चिनी मालावर बहिष्कार घालणं हे भारताच्या हिताचं नाही. कारण अनेक चिनी वस्तुंचे उत्पादन भारत करू शकत नाही आणि युरोप, अमेरिकेकडून या वस्तु तेवढ्या कमी किंमतीत भारताला मिळणारही नाही. चिनी मोबाइल, चिनी दिवे, चिनी मातीच्या वस्तू आणि सेटकेस भारतीय ग्राहकांसाठी सर्वाधिक उपयोगी ठरत आहेत. कमी किंमत आणि चांगल्या दर्जामुळे या वस्तू दुसऱ्या देशांकडून घेणं भारताला अवघड असेल, असं चीनच्या सरकारी माध्यमांनी म्हटलंय.

एक इंच जमीनही बळकावण्याची हिंमत करू नका, PM मोदींचा चीनला इशारा

जीडीपीवरून धमकी

चीनची जीडीपी भारताच्या तुलनेत पाच पट अधिक आहे. यामुळे छोटी असलेली भारताची अर्थव्यवस्था चीनला आव्हान कसे काय देणार. भारताने अमेरिकेच्या धोरणांप्रमाणे अनुसरण करू नये. भारतीय नागरिकांच्या जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होईल, अशी धमकी चीनने दिलीय.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Anil Deshmukh on Ambani Bomb Scare Case: ‘अँटिलिया’बाहेरील स्कॉर्पिओचं गूढ वाढलं; ATSकडे तपास, ‘ही’ मागणी फेटाळली – ambani bomb scare case investigation handed over...

हायलाइट्स:मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी तपास एटीएसकडे.कारमालकाच्या मृत्यूनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली महत्त्वाची घोषणा.एनआयएकडे तपास देण्याची विरोधी पक्षाची मागणी गृहमंत्र्यांनी फेटाळली.मुंबई:...

LIVE : उदयनराजेंच्या कुटुंबातील लग्न सोहळ्याला राज ठाकरेंसह दिग्गजांची हजेरी | Coronavirus-latest-news

11:32 pm (IST) भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांचे भाचे अतिशराजे पवार यांचा विवाह सोहळा नाशिकमध्ये पार पडला....

Recent Comments