Home आपलं जग करियर chinese systems and software: चायनीज सॉफ्टवेअर: IIT अॅलुम्नाय काउन्सिलने उचललं 'हे' पाऊल...

chinese systems and software: चायनीज सॉफ्टवेअर: IIT अॅलुम्नाय काउन्सिलने उचललं ‘हे’ पाऊल – iit alumni council to eliminate all chinese systems and software in all its initiatives with immediate effect


भारत सरकारने चीनच्या स्मार्टफोन अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर आयआयटी अॅलुम्नाय काउन्सिलने देखील एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मेगालॅबसर सर्व ठिकाणच्या चायनीज सिस्टीम्स आणि सॉफ्टवेअरवर बंदी आणण्याचा निर्णय काउन्सिलने बुधवारी जाहीर केला.

काउन्सिलने सांगितलंय की त्यांनी यापूर्वीच भारतीय बनावटीच्या सिस्टीम आणि सॉफ्टवेअर विकसित करण्याचं काम सुरू केलं आहे. गेल्या काही आठवड्यांपासून काऊन्सिल चायनीज सिस्टीम आणि सॉफ्टवेअरला पर्याय म्हणून स्वस्त आणि भारतीय सिस्टीम बनवण्याचं काम करत आहे. आयआयटी रुरकी ही संस्था RTPCR प्रक्रियेत वापरलं जाणारं प्लास्टिक डिस्पोजेबल रिसायकल करण्याचं काम करते. या उपक्रमातही आता भारतीय उपकरणे आणि सॉफ्टवेअरची मदत घेतली जाणार आहे. RTPCR टेस्ट किटचा वापर झाल्यावर त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया तयार करण्यासाठी आयसीटी मुंबई ही रसायन तंत्रज्ञान संस्थाही आपलं योगदान आयआयटींना देत आहे.

आयआयटी अॅल्युम्नाय काउन्सिलचे अध्यक्ष रवी शर्मा म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतचं आवाहन केलं तेव्हापासूनच आम्ही भारतीय बनावटीची सिस्टीम तयार करण्याचं काम सुरू केलं आहे. आयआयटी अॅल्यु्म्नाय समुदाय आणि मुंबई विद्यापीठ, आयसीटी यांसारख्या भागीदार संस्था मिळून वर्ल्ड क्लास सिस्टीम आणि सॉफ्टवेअर देऊ, असा आम्हाला विश्वास आहे. केवळ स्वत:साठीच नव्हे तर हे तंत्रज्ञान आम्ही एक्सपोर्टही करू.’

नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी; आरोग्य मंत्रालयाला पत्र

कोट्यवधी विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅब, टीव्ही? केंद्राचा प्रस्ताव

‘चायनाच्या अॅपवर बंदी आणण्याचा निर्णय योग्य आहे. भारतीय सॉफ्टवेअर उद्योग कोणतंही मार्केट काबीज करू शकतात. आम्ही चीनच्या सॉफ्टवेअर आणि सिस्टीम तंत्रज्ञानाला एक चांगला पर्याय भारतात आणि भारताबाहेरील मार्केटमध्येही उपलब्ध करून देऊ शकतो,’ असं आयआयटी कोलकाताचे अॅल्युम्नस आणि आयआयटी अॅल्युम्नाय चळवळ २००२ चे संस्थापक पवन कुमार म्हणाले.

‘हे’ राज्य अभ्यासक्रमात आणणार करोनाचा धडा

‘सरकारने चीनच्या अॅप्लिकेशन्सवर बंदी घालण्याचे उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. आपल्या देशाला, लोकांची हानी करणाऱ्या या ट्रोजन हॉर्सेसना थांबवण्याची हीच वेळ आहे. भारतीय सॉफ्टवेअर उद्योग जगात सर्वोत्तम आहे. हे टॅलेंट दाखवण्याची संधी सरकारच्या या निर्णयामुळे मिळाली आहे. बी व्होकल अँड बाय लोकल हे खरे घोषवाक्य आहे,’ असं आयआयटी अॅल्युम्नस आणि व्हीएसएनएलचे माजी सीएमडी बी. के. सिंगल म्हणाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

R. Ashwin: टीम इंडियामध्ये लागलं मोठं चॅलेंज, पुजाराने ‘ही’ गोष्ट केल्यावर अश्विन अर्धी मिशी ठेवणार – ind vs eng : indian cricketer r. ashwin...

नवी दिल्ली, IND vs ENG : भारतीय संघामध्ये सध्याच्या घडीला एक मोठं चॅलेंज लागलेलं आहे. हे चॅलेंज भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने भरवश्याचा फलंदाज...

farmers protest Delhi: farmers protest delhi : दिल्लीत शेतकरी आंदोलनात हिंसाचार; अभिनेता दीप सिद्धू चर्चेत – farmers protest delhi yogendra yadav and gurnam singh...

नवी दिल्लीः दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारामागे ( violence in farmers protest ) पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू ( deep sidhu...

Recent Comments