Home देश chinese troops moved back: भारत-चीन वाद: चीनने आपले काही सैनिक मागे हटवले,...

chinese troops moved back: भारत-चीन वाद: चीनने आपले काही सैनिक मागे हटवले, वाहनेही घेतली मागे – india china clash chinese troops and vehicles moved back in galwan area shows latest satellite photos


नवी दिल्ली: चीनने गलवान खोऱ्यातील आपले काही सैनिक आणि वाहने पुढे आलेल्या ठिकाणांवरून मागे हटवले आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि चीनदरम्यान पूर्व लडाख सीमेवर तणाव कमी करण्यासाठी २२ जून या दिवशी कोअर कमांडर स्तरावर चर्चा झाली होती. या चर्चेदरम्यान, चीनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) पुढे येऊन तैनात केलेले आपले सैनिक मागे हटवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, चीनने गलावान भागात आपले काही सैनिक आणि वाहने मागे हटवली आहेत.

पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये दीर्घ काळापासून संघर्ष सुरू आहे. १५ जूनच्या रात्री या संघर्षाने गलवान खोऱ्यात टोक गाठले. १५ जूनच्या रात्री दोन्ही सैनिकांमध्ये हिंसक सघर्ष झाला. या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले. या संघर्षात चीनचे ४० सैनिक ठार झाले, मात्र चीनने अधिकृतपणे हे स्वीकारलेले नाही. या नंतर तणाव कमी करण्यासाठी २२ जूनला कोअर कमांडर स्तरावर चर्चा झाली होती. यात चीनने विद्यमान स्थितीवरून आपल्या सैनिकांना मागे घेण्याचे आश्वासन दिले होते.

चीनचे सैनिक मागे गेल्याचे उपग्रह छायाचित्रावरू स्पष्ट

चीनचे सैनिक पुढे आलेल्या ठिकाणांवरून मागे हटल्याचे वृत्त टाइम्स नाऊ या वृत्त वाहिनीने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील प्राप्त झालेल्या छायाचित्रांच्या आधारे सांगितले आहे. चीन हे अधिकृतपणे मानायला तयार झालेला नसला तरी देखील उपग्रहाद्वारे प्राप्त झालेल्या छायाचित्रावरून हे स्पष्ट झाले आहे, असे वृत्तात म्हटले आहे.

जखमींवरील उपचारासाठी फील्ड रुग्णालय

उपग्रहांद्वारे प्राप्त झालेल्या छायाचित्रामध्ये मर्सिडीज कार दिसत आहेत. यावरून गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर सैन्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या संघर्षात चीनी सैन्याचे किती नुकसान झाले याची तपासणी करण्यासाठीच ते तेथे आले असल्याचे सांगितले जात आहे. सोबत काही रुग्णवाहिका देखील दिसत आहेत. तसेच जखमी सैनिकांवर उपचार करता यावेत यासाठी तिथे तातडीने फील्ड रुग्णालयही उभारण्यात आले आहे.

वाचा: चीनने S-400 मिसाईल तैनात केल्यास भारताकडे पर्याय काय?

चीनने अडवले नदीचे पाणी

या बरोबरच संघर्षात जखणी झालेल्या सैनिकांना एअरलिफ्ट केले जाऊ शकत नव्हते. त्यांना रस्ते मार्गानेही हलवणे कठीण झाले होते. म्हणूनच तातडीने तेथे फील्ड रुग्णालय उभारण्यात आले. या वरून चीनी सैनिकांना गलवान खोऱ्यात ५ किमीपर्यंत मागे हटवण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. हे ठिकाण पीपी ४ जवळ आहे. तेथे चीनने नदीचे पाणी देखईल अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता हे पाणी वाहत असल्याचे ताज्या छायाचित्रात दिसत आहे.

वाचा: गलवान: चीनच्या कुरापती सुरू; वादग्रस्त ठिकाणी पुन्हा उभारले तंबू
गोगरा हॉट स्प्रिंगमध्ये देखील मागे हटले चीनी सैनिक

मे महिन्याच्या सुरुवातीच्या छायाचित्रात गोगरा हॉट स्प्रिंग भागात देखील चीनच्या सैन्याने पायवाटांवर तंबू उभारले होते. मात्र ताज्या छायाचित्रात ते आता दिसत नाहीत. आता तेथे भारतीय सैन्याचे तंबू दिसत आहेत.

वाचा: क्षेपणास्त्र, दारुगोळा लवकर पाठवा; भारताची रशियाला विनंतीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Amravati lockdown news: Amravati Lockdown: अमरावती, अचलपुरात लॉकडाऊन वाढवला; ‘हे’ शहरच कंटेन्मेंट झोन! – lockdown in amravati achalpur extended till march 8

हायलाइट्स:अमरावती विभागात अनेक शहरांत करोनाचे थैमान.अमरावती व अचलपूरमध्ये लॉकडाऊन वाढवला.नागपुरातील स्थिती गंभीर, लॉकडाऊन लावला जाण्याची शक्यता.अमरावती: विदर्भात सध्या अमरावतीमध्ये करोनाने थैमान घातले असून...

Dilip Vengsarkar: एक महान फलंदाज,महान गोलंदाज झाला; अहमदाबादच्या पिचवर मुंबईच्या क्रिकेपटूची घणाघाती टीका – ind vs eng ahmedabad pitch wicket bad advertisement for test...

हायलाइट्स:भारताने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत १० विकेटनी विजय मिळवलाकसोटी सामना दुसऱ्याच दिवशी संपल्याने पिचवर होतेय टीकाभारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी केली मोठी टीका...

Recent Comments