केंद्राने घेतली कापूस खरेदीची हमी
अईन पावसाळ्याच्या तोंडावर कापसाच कसं होईल ! या चिंतेत पडलेला शेतकरी अखेर केंद्राच्या हमिने चिंता मुक्त झाला आहे.
राज्य शासनातर्फे तसेच केंद्र शासनातर्फे कापूस संकलन केंद्र राज्यामध्ये सुरू होती .पण शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यास राज्य व केंद्र शासनाचे कापूस संकलन केंद्र खरेदी करायला तयार नव्हते.
चंद्रपूर जिल्ह्यातील माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यात आंदोलन व रास्ता रोको करण्यात आले .पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली .मात्र राज्यशासनाला घाम फुटला नाही. कापूस संकलन केंद्रावर कर्मचाऱ्यांची होत असलेली मनमानी शेतकऱ्यांची होत असलेली अवहेलना लक्षात घेता. निमकर यांनी नागपूर चे हायकोर्टात याचिका दाखल केली.
कापूस संकलन केंद्रावर शेतकऱ्यां ची होत असलेली अडवणूक व पिळवणूक थांबवण्यात यावी. अगोदरच अडचणीत सापडलेला शेतकरी कापूस खरेदी न होत असल्याने चिंतामग्न झाला आहे. याबाबत केंद्र शासन व राज्य शासनाने त्वरित दखल घेऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कापूस शासकीयदराने विकत घ्यावा. यासाठी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती .यात केंद्र शासन व राज्य शासनाला पार्टी करण्यात आले होते .
या याचिकेवर सुनावणी होऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा कापूस सप्टेंबर महिन्यापर्यंत खरेदी करण्याची हमी कोर्टासमक्ष दिली आहे. त्यात शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये त्यांचा संपूर्ण कापूस खरेदी करण्यासाठी शासन वचनबद्ध आहे ,त्यांचा संपूर्ण कापूस खरेदी करून शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून देण्यात येईल, केंद्र शासनातर्फे अशी हमी देण्यात आली आहे ,या हमीमुळे शेतकरी आता सुखावला असून कापसाच्या बद्दल तो चिंतामुक्त झाला आहे.
याचिकाकर्त्यांतर्फे सबळ बाजू मांडणारे मुळचे चंद्रपूर जिल्ह्याचे रहिवासी असलेले प्रसिद्ध वकील अनिल ढवस यांनी शेतकऱ्यांची बाजू रीतसर मांडल्याने शेतकऱ्यांना खरा व लवकर न्याय मिळाला आहे ,खऱ्या अर्थाने केंद्र सरकारने राज्यातल्या शेतकऱ्यांना चिंता मुक्त केले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करण्याची हमी दिली होती . तसेच शेतकऱ्यांना कर्ज मुक्त नाही तर चिंतामुक्त करायचआहे .असे दमदार भाषण नागपुरातील पहिल्याच अधिवेशनात केले होते. पण हे सगळं फोल ठरल.
पण विदर्भातील शेतकरी कर्जमुक्त झालाच नाही अण चिंतामुक्तही झाला नाही . राज्यातील शेतकऱ्यांचा सध्याच्या हंगामी मुख्यमंत्र्यावरचा विश्वास पूर्णता उडालेला दिसतो. त्यामुळे सध्याच्या सरकारवर शेतकरी नाराज असल्याचे दिसतं. केंद्राने शेतकऱ्यांची चिंता मिटवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केंद्राच् आभार मानले पाहिजे.