Home क्रीडा Chris Gayle: धक्कादायक... 'रागाच्या भरात ख्रिस गेल आयपीएलमधील खेळाडूला जीवानिशी मारणार होता'...

Chris Gayle: धक्कादायक… ‘रागाच्या भरात ख्रिस गेल आयपीएलमधील खेळाडूला जीवानिशी मारणार होता’ – west indies cricketer wants to kill rashid khan in ipl 2018, revel by lokesh rahul


वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेल हा आयुष्याची मजा घेणारा खेळाडू आहे. पण एकदा आयपीएल सुरु असताना गेलला एका खेळाडूचा राग आला होता. त्यावेळी रागाच्या भरात गेल हा त्याला खेळाडूला जीवानिशी मारणार होता, असा धक्कादायक खुलासा एका भारतीय क्रिकेटपटूने केला आहे.

गेलने आपल्या धमाकेदार फलंदाजीने आपले नाव कमावले आहे. गेल सुरुवातीला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंज बंगळुरु या संघात होता. पण या संघाने काही वर्षानंतर त्याला आपल्या संघात कायम ठेवले नाही. त्यानंतर त्याला किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाने आपल्या ताफ्यात घेतले आणि सध्या तो पंजाबच्या संघाडकडूनच खेळत आहेत.

ख्रिस गेल

आयपीएलमध्ये काही वेळेला चांगलेच घमासान पाहायला मिळते. कारण प्रत्येक खेळाडूला आपल्या संघासाठी सामना जिंकायचा असतो आणि तुम्ही जेव्हा चांगल्या फॉर्ममध्ये नसता तेव्हा तर तुम्ही अधिक आक्रमक झालेले असता. गेल असाच एकदा आक्रमक झाला होता आणि प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूचा जीव घेणार होता. हा धक्कादायक खुलासा आयपीएलमध्ये पंजाबकडून गेलबरोबर सलामीला येणाऱ्या लोकेश राहुलने केला आहे.

नेमके घडले तरी काय…
ही गोष्ट घडली ती आयपीएलच्या २०१८ साली झालेल्या हंगामात. यावेळी पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना सुरु होता. या सामन्यापूर्वी गेलला अपेक्षित चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे तो आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करत होता. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याची चांगली फलंदाजी होत होती. पण त्यावेळी एका गोलंदाजाच्या काही गोष्टी त्याला खटकल्या होत्या.

maharashtra times

ख्रिस गेल

याबाबत राहुलने सांगितले की, ” या सामन्यात गेल चांगली फलंदाजी करत होता आणि आतापर्यंत चांगली कामगिरी न झाल्यामुळे त्याला संघाला हा सामना जिंकवून द्यायचा होता. यावेळी गेलपुढे मोठे आव्हान होते ते हैदराबादचा फिरकीपटू रशिद खानचे. तो मला म्हणाला की, रशिद खानने जर मला गुरगुरून दाखवले तर मी त्याला सोडणार नाही. मी त्याला संपवून टाकेन. कारण कोणत्याही फिरकीपटूने माझ्या समोर येऊन गुरगुरणे मला कदापी सहन होणार नाही.”Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in mumbai latest news: Coronavirus In Mumbai: मुंबईत ४ महिन्यांतील सर्वाधिक रुग्णवाढ; ‘हे’ आकडे टेन्शन वाढवणारे – mumbai records 1167 covid 19 cases...

हायलाइट्स:मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात करोनाचा धोका वाढला.मुंबईत झाली चार महिन्यांतील सर्वाधिक रुग्णवाढ.ठाणे जिल्ह्यातही नवीन ६१४ रुग्णांची पडली भर.मुंबई: राज्याची राजधानी मुंबईवरील करोना संसर्गाचा...

'सुपर संभाजीनगर'च्या परवानगीची चौकशी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून शहरात '' चे डिस्प्ले लावण्याची परवानगी देण्यात आली आहे का याची चौकशी केली जाईल,...

virat kohli: IND vs ENG : विराट कोहलीला मिळाले जीवदान, पाहा कोणी सोडला सोपा झेल… – ind vs eng : indian captain virat kohli’s...

अहमदाबाद, IND vs ENG : भारताचा कर्णधार विराट कोहलीला पहिल्याच दिवशीच जीवदान मिळाल्याचे पाहायला मिळाले. विराटचा सोपा झेल यावेळी इंग्लंडच्या खेळाडूने सोडल्याचे पाहायला...

प्रियांका चोप्रा: पलटवार असावा तर असा! लोकांनी उडवली ड्रेसची थट्टा, पाहा प्रियांका चोप्राचं उत्तर – priyanka chopra tweet her viral memes on her dress...

हायलाइट्स:प्रियांका चोप्रा आणि फॅशन याजणू एकाच नाण्याच्या दोन बाजूप्रियांकाच्या ड्रेसवर व्हायरल होत आहेत मीम्सस्वतः प्रियांकानेही घेतला या मीम्सचा आनंदमुंबई- प्रियांका चोप्राचा हात फॅशन...

Recent Comments