Home देश पैसा पैसा ckp bank licence cancelled by rbi: ...म्हणून सीकेपी बँकेचा परवाना रद्द झाला...

ckp bank licence cancelled by rbi: …म्हणून सीकेपी बँकेचा परवाना रद्द झाला – ckp bank’s debt recovery slows as rbi cancelled licence


म. टा. प्रतिनिधी, मुंबई : सीकेपी सहकारी बँकेच्या कर्जबुडव्या संचालकांकडून चार वर्षांपूर्वी केवळ सहा महिन्यांत ५५ कोटी रुपये वसूल झाले होते. पण त्यानंतर मागील चार वर्षांत फक्त ९० कोटी रुपयांची वसुली झाली. हेदेखील बँकेचा परवाना रद्द होण्याचे महत्त्वाचे कारण ठरले आहे.

तब्बल १ लाख ३१ हजार ५०० खातेदार-ठेवीदार असलेल्या सीकेपी सहकारी बँकेवर सन २०१४पासून रिझर्व्ह बँकेचे निर्बंध आहेत. त्यावेळी बँकेवर प्रशासक नेमण्यात आले. पुढे ठेवीदारांनीच बँकेची निवडणूक घेण्याची मागणी केली. त्यामुळे २०१५-१६ या आर्थिक वर्षात बँकेवर नवीन संचालक मंडळ स्थापन झाले. या मंडळातील जबाबदार सदस्यांनी थकित व बुडित कर्जांची प्रयत्नपूर्वक वसुली सुरू केली. अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांनी सुमारे ५५ कोटी रुपयांची रक्कम कर्जबुडव्यांकडून वसूल केली. परंतु त्यावेळी माजी संचालकांच्या प्रभावाने संचालक मंडळातील काही सदस्यांनी या वसुलीत मोडता आणला. यामुळे संचालक मंडळाला राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर बँकेवर पुन्हा प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. यामुळे ही वसुली पुन्हा रखडली.

सर्व कर्जखाती थकित-बुडित

बँकेवर दुसऱ्यांदा प्रशासक मंडळाची नियुक्ती होऊन आता चार वर्षे झाली आहेत. या चार वर्षांत फक्त ९० कोटी रुपयांच्या थकित व बुडित कर्जाची वसुली झाली आहे. वास्तवात अद्यापही १५३ कोटी रुपयांचे कर्ज थकित व बुडित खात्यात आहे. वसुलीबाबत भीषण उदासीनता असल्याने बँकेचे नक्त मूल्य उणे ४७ टक्क्यांवर पोहोचले. आज जवळपास सर्व कर्जखाती थकित किंवा बुडित खात्यात आहेत. परिणामी रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केला आहे.

९९ टक्के ठेवीदारांना पूर्ण पैसे मिळणार

सीकेपी सहकारी बँकेच्या ९९ टक्के ठेवीदारांना पूर्ण पैसे मिळतील, असे रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. ठेवींवरील विमा सुरक्षेनुसार ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळेल. १ लाख ३२ हजार १७० ठेवीदारांना पैसे परत मिळतील, असे आरबीआयने म्हटलं आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

mumbai maximum temperature: मुंबईच्या तापमानात वाढ – mumbai weather : mumbai maximum temperature increases

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईसह राज्याच्या काही शहरांत पहाटे अजूनही किंचितसा गारवा जाणवत असला तरी हळुहळू तापमान वाढत आहे. किमान आणि कमाल तापमान...

MNS-BJP alliance: Nashik: मनसेच्या ‘या’ दोन निर्णयांमुळं नव्या राजकीय समीकरणांची चर्चा – bjp mns may form alliance to fight nashik municipal election

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकमहापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समिती निवडणुकीतही मनसेने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र...

shiv sena vs bjp in bmc: शिवसेनेवरचा ‘हा’ आरोप भाजपला भलताच महागात पडला! – maha vikas aghadi parties hit the bjp over distribution of...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईगेल्या वर्षीच्या विकासनिधीचा शिवसेनेकडून गैरवापर झाल्याचा आरोप भाजपलाच महागात पडला आहे. यंदाच्या विकासनिधी वाटपात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि...

Recent Comments