Home आपलं जग करियर CLAT 2020: CLAT 2020 परीक्षा २२ ऑगस्ट रोजी - clat 2020 common...

CLAT 2020: CLAT 2020 परीक्षा २२ ऑगस्ट रोजी – clat 2020 common law admission test will be held on 22 august 2020


CLAT 2020: कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० कधी आयोजित केली जाणार आहे, त्याविषयी कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने माहिती जाहीर केली आहे. ही परीक्षा शनिवार, २२ ऑगस्ट २०२० रोजी होणार आहे. ही परीक्षा कोविड – १९ विषाणूंच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड, ऑनलाइन, सेंटर बेस्ड असणार आहे. दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत घेण्यात येणारी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्ली ची परीक्षा NLU १८ ऑगस्ट रोजी होणार आहे.

या परीक्षेसाठी उमेदवार १० जुलै २०२० पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. CLAT 2020 परीक्षेसाठी कोणकोणती परीक्षा केंद्र असतील त्याची याची उमेदवारांना १ जुलै रोजी कळवण्यात येणार आहे. ही यादी १ जुलैला जाहीर करण्यात येईल. उमेदवारांनी त्यांची परीक्षा केंद्रे पुन्हा सुनिश्चित करावी, शिवाय ज्यांना त्यांची नोंदणी मागे घ्यायची आहे, ते उमेदवारही १० जुलैपर्यंत ही प्रक्रिया करू शकतात. जे उमेदवार परीक्षा नोंदणी मागे घेतील त्यांना त्यांचे परीक्षा शुल्क काही ठराविक रक्कम वजा करून परत केले जाणार आहे. हा परतावा उमेदवारांना १८ जुलै २०२० पर्यंत मिळेल, असंही कन्सोर्टिअमने कळवलं आहे.

नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी; आरोग्य मंत्रालयाला पत्र

सीए परीक्षा: ऑप्ट आऊटसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

१८ मे २०२० रोजी कन्सोर्टियमची बैठक झाली होती. या बैठकीत कन्सोर्टियमने करोना व्हायरसच्या आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर क्लॅट २०२० परीक्षेचा आढावा घेतला. या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले होते. त्यानुसार, सीएलएटी 2020 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १ जुलै २०२० करण्यात आली होती. सीएलएटी 2020 ची नोंदणी प्रक्रिया १ जानेवारीपासून सुरू झाली आहे. कन्सोर्टियमद्वारे सीएलएटी २०२० च्या परीक्षेची तारीखही १ जुलैपर्यंत जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते, त्यानुसार ३० जून रोजी क्लॅट परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

bad cholesterol increased in youths: ‘लॉकडाउन’मध्ये तरुणाईच्या चरबीत वाढ – youths bad cholesterol levels increased in body due to work home home and lockdown

म. टा. प्रतिनिधी, पुणेकरोनाच्या साथरोगाच्या काळात झालेल्या लॉकाडाउनदरम्यान 'वर्क फ्रॉम होम'मुळे शारीरिक हालचालींवर आलेल्या मर्यादा आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरातील 'बॅड कोलेस्ट्रॉल'ची पातळी...

e catering services in railway: Indian Railway : लसीकरण मोहिमेसोबतच रेल्वेच्या प्रवाशांना खुशखबर – indian railways allows e catering services at selected railway stations...

नवी दिल्ली : आजपासून देशभरात करोनाविरुद्ध लसीकरण मोहिमेला सुरुवात झालीय. त्याचसोबत रेल्वेकडूनही प्रवाशांना खुशखबर देण्यात आलीय. भारतीय रेल्वेकडून देशातील काही ठराविक रेल्वे स्थानकांवर...

बळीराजाला बळ

म. टा. प्रतिनिधी, मुंबई मागील ५० दिवस दिल्लीत वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी संयुक्त...

Recent Comments