Home शहरं मुंबई cm pays homage to matkari: रत्नाकर मतकरी यांचं जाणं मनाला वेदना देणारं:...

cm pays homage to matkari: रत्नाकर मतकरी यांचं जाणं मनाला वेदना देणारं: उद्धव ठाकरे – uddhav thackeray pays homage to veteran writer ratnakar matkari


मुंबई:रत्नाकर मतकरी यांच्या निधनाची बातमी मनाला खूप वेदना देणारी आहे. त्याच्या रूपानं महाराष्ट्राच्या साहित्य विश्र्वातील अमुल्य असं एक साहित्य ‘रत्न’ निखळलं, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांचे निधन

रत्नाकर मतकरी यांनी त्यांच्या साहित्यातून, नाटकांमधून लहान मुलांना, मोठ्यांना निखळ आनंद दिला. आमच्या पिढीतल्या लहानांचे भावविश्व साकारले. महाराष्ट्राचे साहित्य-नाट्य क्षेत्र समृद्ध केले. त्यांचे निधन निश्चितपणे धक्का देणारे आहे, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मतकरी यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त केल्या आहेत. ‘रत्नाकर मतकरी हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेलं आहे. महाराष्ट्रातील आबालवृद्धांसाठी त्यांनी साहित्यनिर्मिती केली. कथा, गूढकथा, कादंबरी, एकांकिका, नाटकं अशा साहित्याच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी मुशाफिरी केली. रंगभूमीवर यशस्वी नाटककार, दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी लोकप्रियता मिळवली. त्यांच्या रूपानं एक महान व्यक्तिमत्व हरपलं आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

काल रात्री साडेअकराच्या सुमारास मतकरी यांचं निधन झालं. प्रकृती बिघडल्यामुळं चार दिवसांपूर्वी त्यांना गोदरेज रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांना करोनाची लागण झाल्याचं तपासणीनंतर स्पष्ट झालं होतं. त्यानंतर त्यांच्यावर सेवन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथंच उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शरद पवार यांच्याकडूनही आदरांजली

‘मतकरी यांचं निधन चटका लावून जाणारं आहे. नाटककार म्हणून, विशेषतः बालरंगभूमीसाठी त्यांचे योगदान मोठे आहे. मराठी साहित्यातील कथा व ललित प्रांतातही त्यांनी अव्याहत दर्जेदार लेखन केले,’ असं पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pm modi interacts with startups: नवीन स्टार्टअपसाठी १ हजार कोटींचा फंड; PM मोदी म्हणाले, ‘आमचा फोकस तरुणांवर’ – pm modi interacts with startups during...

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'प्रारंभः स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय समिट'ला संबोधित केले. वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन...

Recent Comments