Home महाराष्ट्र cm uddhav thackeray: महाराष्ट्र आत्मनिर्भर करायचाय, भूमिपुत्रांनो पुढे या: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

cm uddhav thackeray: महाराष्ट्र आत्मनिर्भर करायचाय, भूमिपुत्रांनो पुढे या: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – cm uddhav thackeray appealed bhoomiputra step out and join industries for aatmanirbhar maharashtra


मुंबई: राज्यात ग्रीन झोनमध्ये उद्योग सुरू झाले आहेत. परराज्यांतील मजूर त्यांच्या गावी परतले आहेत. उद्योगांना मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्यामुळं हा महाराष्ट्र उभा करण्यासाठी, आत्मनिर्भर करण्यासाठी भूमिपुत्रांनी पुढे यावे. रोजगाराची संधी दवडू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं. हा शिवरायांचा लढवय्या महाराष्ट्र आहे, हे जगाला दाखवून द्या, असंही ते म्हणाले.

राज्यात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी राज्यातील नागरिकांशी फेसबुक लाइव्हद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी भूमिपुत्रांना आवाहन केलं. राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अशी वर्गवारी केली आहे. ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करून उद्योगांना मान्यता दिली आहे. ७० हजार उद्योगांना परवानगी दिली असली तरी, प्रत्यक्षात ५० हजार उद्योग सुरू झाले आहेत, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.

राज्याचं अर्थचक्र अधिक गतिमान करतानाच, हा महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात नव्यानं भरारी घेण्यास सज्ज झाला आहे. याचाच एक भाग म्हणून ४० हजार एकर जमीन नवीन उद्योगांसाठी राखून ठेवली आहे. त्याचा लाभ घेऊन विदेशी आणि देशातील उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रदूषण न करणाऱ्या उद्योगांना कोणत्याही अटींशिवाय उद्योग सुरू करता येणार आहे. सर्व पायाभूत सुविधा आम्ही देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

लॉकडाऊन कठोरच; पावसाळ्यापूर्वी करोनावर नियंत्रण मिळवायचंय: उद्धव ठाकरे

ग्रीन झोनमधील उद्योगांना परवानगी दिली आहे. मात्र, तिथं सध्या कामगारांची कमतरता आहे. परराज्यांतील बहुतांश कामगार निघून गेले आहेत. मनुष्यबळ कमी पडत असेल तिथं भूमिपुत्रांची गरज आहे. आतापर्यंत तुम्ही सरकारचं ऐकलं आहे. घरात सुरक्षित राहून राज्याला वाचवलं आहे. आता पुन्हा उद्योग सुरू झाले आहेत. या राज्याला तुम्हाला वाचवायचं आहे. त्या निर्धारानं तुम्ही बाहेर पडा. ग्रीन झोनमधील उद्योगांना मनुष्यबळ कमी पडत असेल तर, हा महाराष्ट्र पुन्हा उभा करण्यासाठी, आत्मनिर्भर करण्यासाठी स्वतःहून पुढे या, असं आवाहन त्यांनी केलं. जे उद्योग सुरू झालेत, तिथं रोजगाराच्या संधी आहेत. ती संधी दवडू नका. उद्योग सुरू करून हा महाराष्ट्र पुन्हा उभा करू. शिवरायांचा महाराष्ट्र लढवय्या आहे हे जगाला दाखवून द्यायचे आहे, असंही तते म्हणाले.

Live: महाराष्ट्रात रेड झोनमधील निर्बंध शिथिल नाहीच: उद्धव ठाकरे

मजुरांनो, घाई कशाला करताय, तुम्हाला सुरक्षित तुमच्या गावी पोहोचवू!

मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडून त्यांना त्यांच्या राज्यात सुखरूप जाऊ द्या, ही मागणी सुरुवातीपासून करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्राला या श्रमिकांचे अजिबात ओझे नव्हते, परंतु मजुरांची त्यांच्या राज्यात, घरी जाण्याची तीव्र इच्छा होती. त्या इच्छेचा सन्मान राखत आता सुरू झालेल्या श्रमिक विशेष ट्रेनद्वारे ५ लाख मजूर नियोजनबद्धरित्या त्यांच्या राज्यात परतले आहेत. रेल्वे आणि बसमधून त्यांना त्यांच्या राज्यात पोहोचवले जात आहे. अजूनही काही मजूर रस्त्यांनी चालत जात आहेत. तुम्ही घाई करू नका. जिथे आहात तिथेच थांबा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तुम्हाला तुमच्या राज्यात पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. रेल्वे सेवा सुरू झाली आहे. या सर्वांचा प्रवास खर्च सरकार करत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments