Home शहरं मुंबई cm uddhav thackeray: मुंडे, तावडे, गोऱ्हे, सावंत यांची नावे विधान परिषदेसाठी चर्चेत...

cm uddhav thackeray: मुंडे, तावडे, गोऱ्हे, सावंत यांची नावे विधान परिषदेसाठी चर्चेत – many big leaders including cm uddhav thackeray may contest in maharashtra legislative council elections


मुंबई: येत्या २१ मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपकडून पंकजा मुंडे, विनोद तावडे, काँग्रेसकडून नसीम खान, सचिन सावंत आणि शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे विधान परिषदेचे तिकीट कुणाला मिळाणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

येत्या २१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ जागांसाठी मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध पार पडावी म्हणून महाविकास आघाडीकडून ५ तर भाजपकडून ४ उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून पाचपैकी शिवसेना आणि काँग्रेसला दोन तर राष्ट्रवादीला एक जागा मिळणार आहे. त्यामुळे आपल्याच पदरात उमेदवारी पडावी म्हणून या चारही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

गणेशोत्सव होणारच, पण साधेपणाने! सार्वजनिक गणेशोत्सव समितीचा निर्णय

शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या दोन जागांपैकी एका जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उभे राहणार आहेत. तर दुसऱ्या जागेसाठी नीलम गोऱ्हे यांच्या नावाचा विचार सुरू आहे. निलम गोऱ्हे यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ २४ एप्रिल रोजी संपुष्टात आल्याने त्यांना पुन्हा एकदा संधी देण्याचं शिवसेनेत घाटत असल्याचं सांगण्यात येतं. तर काँग्रेसमध्ये दोन जागांसाठी माजी मंत्री नसीम खान, महाराष्ट्र प्रवक्ते सचिन सावंत, मुजफ्फर हुसेन आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. तर भाजपकडून पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. शिवाय भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही विधान परिषदेवर जाण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांचे नावही विधान परिषदेसाठी चर्चेत आले आहे.

विधान परिषदेची सदस्य संख्या आणि मानक प्रक्रिया पाहता एका जागेवर निवडून येण्यासाठी २९ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे नऊ जागांवर नऊच उमेदवार देऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यावर सत्ताधारी आणि विरोधकांची तयारी सुरू असल्याचं बोललं जातंय.

LIVE: राज्यात १० हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार सुरूSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Fawad Ahmed: करोना प्रोटोकॉलची ऐशी तैशी; बायो बबलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूला करोना – after fawad ahmed of australia was infected with kovid 19 pcb’s bio...

हायलाइट्स:क्रिकेटपटू फवाद अहमद याला बायो बबलमध्ये असताना करोनाची लागणतो सध्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा खेळत आहेपाक बोर्ड बायो-बबल प्रोटोकॉल नीट ठेवण्यात अपयशीकराची: पाकिस्तानमध्ये...

शेतकरी आंदोलनावर गप्प का आहेस?; मुंबईत रोखली अजय देवगणची कार – man held for blocking ajay devgn’s car over actor’s silence on farmers’ protest

मुंबई: केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात ( farm laws ) शेतकऱ्यांचे आंदोलन ( farmers protest ) सुरूच आहे. या आंदोलनला काही सेलिब्रिटींनी...

Kangana Ranaut: kangana ranaut : शिवसेना नेत्यांकडून जिवाला धोका, कंगनाची सुप्रीम कोर्टात धाव – kangana ranaut in supreme court seeking transfer criminal cases

नवी दिल्लीः मुंबईत दाखल झालेल्या तीन गुन्ह्यांप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत ( kangana ranaut ) आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांनी आता सुप्रीम कोर्टात...

Recent Comments