Home शहरं औरंगाबाद cm uddhav thackeray: शेतकऱ्यांसाठी हवेत २४०० कोटी - marathwada farmers needs 2400...

cm uddhav thackeray: शेतकऱ्यांसाठी हवेत २४०० कोटी – marathwada farmers needs 2400 crore from package cm uddhav thackeray declared yesterday


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दहा हजार कोटी रुपयांचे ‘पॅकेज’ जाहीर केले असून, त्यातून मराठवाड्यासाठी २४०० कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात यावर्षी अतिवृष्टी व पुरामुळे २३ लाख ३६ हजार ४११ हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. शासनाकडून करण्यात आलेल्या घोषणेनुसार कोरडवाहू व बागायत क्षेत्रासाठी सरसकट दहा हजार रुपये हेक्टर (दोन हेक्टर मर्यादा) आणि फळपिकांसाठी २५ हजार रुपये हेक्टरी (दोन हेक्टर मर्यादा) मदत करण्यात येणार आहे. प्राथमिक अहवालानुसार विभागात सुमारे २३ लाख हेक्टरवरील पिके आणि साडेतीन हजार हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज विभागीय आयुक्त कार्यालयातील सूत्रांनी वर्तवला आहे. विभगाातील अद्यापही हजारो हेक्टरचे पंचनामे प्रलंबित असून, येत्या काही दिवसांमध्ये ते पूर्ण करण्यात येणार आहेत. शासनाच्या अहवालानुसार; विभागातील ३० लाख ९ हजार ७६६ शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे.

मराठवाड्यातील नुकसान

जिल्हा———नुकसान (हेक्टर)

औरंगाबाद——–२,६२,८१९.३९

जालना———-४,५९,२००.७५

परभणी———-१,८४,६१२

हिंगोली———-२,५८,६३३.९९

नांदेड———–४,७९,८०४.६५

बीड————३,३६,०७८

लातूर———–१,९१,८१७.७१

उस्मानाबाद——-१,५४,५००

एकूण———–२३,३०,४६६.५ हेक्टरSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nashik News : टपाल विभागाचे खासगीकरण नकोच – don’t reject the privatization of the postal department

म. टा. प्रतिनिधी, नाशिकखासगीकरणाच्या विरोधासह अन्य २१ मागण्यांसाठी टपाल युनियन शुक्रवारी (दि.२७) संपावर जाणार आहे. कामबंद ठेवण्यात येणार असल्याने तसेच शनिवारी व रविवारी...

aurangabad News : दक्षता घ्या, पुन्हा ‘लॉकडाऊन’ नकोच – be careful, don’t ‘lockdown’ again

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोना संसर्गाच्या संकटाशी सामना करण्यासाठी व्यापारीवर्गान वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. अनेक महिने सर्व बाजारपेठ बंद होती. त्यामुळे आर्थिक गणित बिघडले...

Uddhav Thackeray: Uddhav Thackeray: लॉकडाऊन काळात नोकऱ्यांवर गदा; CM ठाकरेंनी दिले ‘हे’ महत्त्वाचे निर्देश – cm uddhav thackeray gave directions on job crisis

मुंबई:करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक तरुणांचे हातचे रोजगार गेले आहेत. त्याचवेळी नव्याने रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. म्हणूनच या रोजगारांच्या अनुषंगाने...

Recent Comments