Home क्रीडा coach Phil Simmons: क्रिकेटचा कोच गेला सासऱ्याच्या अंत्यसंस्काराला, आता स्वतःवरच येणार 'ही'...

coach Phil Simmons: क्रिकेटचा कोच गेला सासऱ्याच्या अंत्यसंस्काराला, आता स्वतःवरच येणार ‘ही’ वेळ – after attends funeral on england tour cwi board member calls removal of coach phil simmons


लंडन: कोरना व्हायरसचा धोका अद्याप टळला नाही. तरी देखील इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडिज संघाला दौऱ्यावर बोलवण्याचा धाडसी निर्णय घेतला. वेस्ट इंडिजचा संघ सध्या इंग्लंडमध्ये असून त्यांनी १४ दिवसांच्या क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण केला आहे. लवकरच दोन्ही संघातील कसोटी मालिकेला सुरूवात होईल. पण ही मालिका सुरू होण्याआधी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.

वाचा- पाकिस्तानचे करायचे तरी काय? करोना काळात केली मोठी चूक!

वेस्ट इंडिज संघाचे मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स हे आठ जुलैपासून सुरू होणाऱ्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी सासऱ्याच्या अंत्यसंस्काराला जाऊन आलेत. आता वेस्ट इंडिज बोर्डातील एका सदस्याने त्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी केली आहे. बारबाडोस क्रिकेट संघाचे (बीसीए) प्रमुख कोंडे रिले यांनी सिमन्स यांचे वर्तन बेजबाबदारपणेचे असल्याचे म्हटले आहे.

वाचा- फक्त ५ दिवसाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर

वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू असलेले सिमन्स यांनी यासाठी बोर्डाची परवानगी घेतली होती आणि अंत्यसंस्कारावरून आल्यानंतर स्वत:ला संघापासून वेगळे ठेवले होते. यासंदर्भात रिले म्हणाले, बीसीएकडून खेळणाऱ्या खेळाडूंच्या पालकांनी यासंदर्भात माझ्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. या पद्धतीचे वर्तन बेजबाबदार आहे. यामुळे इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या त्या २५ खेळाडू आणि पूर्ण संघ व्यवस्थापनाचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. हे कदापी मान्य केले जाणार नाही. यावर कारवाई झालीच पाहिजे.

वाचा-टिकटॉक शिवाय इंटरनेट म्हणजे…; भारतीय खेळाडूचे ट्विट व्हायरल!

वेस्ट इंडिजच्या १४ जणांच्य संघात बारबाडोसचे ९ खेळाडू आहेत. दरम्यान सिमन्स यांनी बाहेर जाण्याआधी आणि पुन्हा आत येताना परवानगी घेतली होती. त्यांची वेस्ट इंडिज बोर्डाकडून तसेच इंग्लंड बोर्डाकडून तपासणी झाली आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार सर्व नियमांचे पालन केल्याचे बोर्डाने सांगितले. सिमन्स यांनी स्वत:ला खेळाडूंपासून वेगळे ठेवले होते. शुक्रवारपासून त्यांची करोनाची दोन चाचणी घेण्यात आली असून त्या दोन्ही नेगेटिव्ह आल्या आहेत.

वाचा- IPL:एका सिझनमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज; अव्वल स्थानी हा भारतीय!

इंग्लंडचा कर्णधार जो रुटला त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी संघातून बाहेर जाण्याची परवानगी दिली होती. त्यामुळेच तो साउथम्पटन येथे होणारा पहिला कसोटी सामना खेळू शकणार नाही. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील या कसोटी माालिकेमुळे आंतरारष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू होत आहे, जे करोना व्हायरसमुळे मार्च महिन्यापासून बंदी होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jinsi police station aurangabad: सुनेवर अत्याचार; सासऱ्याला अटक – aurangabad police arrested 48 years old man for sexual harassment with daughter in law

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादघरी कोणी नसल्याची संधी साधत सुनेवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या ४८ वर्षांच्या नराधम सासऱ्याला जिन्सी पोलिसांनी रविवारी (१७ जानेवारी) रात्री अटक...

bollywood celebrity on indian victory: भारतीय क्रिकेट संघाचा ऐतिहासिक विजय, बॉलिवूड सेलिब्रिटी म्हणाले … – india vs australia celebrities congratulate indian cricket team for...

मुंबई: अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला. चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने ०० विकेटनी विजय मिळवत मालिका २-१...

recruitment in ecgc: केंद्र सरकारी नोकरीची संधी; इसीजीसीमध्ये भरती – recruitment in ecgc i.e. export credit guarantee corporation

प्रा. संजय मोरेआजचं युग स्पर्धेचं बनलं आहे. त्यासाठी कठोर परिश्रम आणि योजनाबद्ध प्रयत्न करावे लागतात, याची जाणीव करून देण्याची आवश्यकता वाढली आहे. राज्यात...

health care tips in marathi: Bird Flu Precautions एव्हियन फ्लू म्हणजे काय, सुरक्षित राहण्यासाठी काय करावं? – bird flu precautions tips what is avian...

डॉ. किर्ती सबनीस, संसर्गजन्य रोगतज्ज्ञमागील काही दिवसांत राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ, महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश येथे बर्ड फ्लू किंवा एव्हियन फ्लू असल्याच्या बातम्या...

Recent Comments