Home शहरं जळगाव Cobra Snake Bite: Cobra Snake Bite सर्पमित्राला 'कोब्रा'दंश; 'करोना'ने अडवली उपचारांची वाट!...

Cobra Snake Bite: Cobra Snake Bite सर्पमित्राला ‘कोब्रा’दंश; ‘करोना’ने अडवली उपचारांची वाट! – snake catcher bitten by cobra in jalgaon


जळगाव: मध्यरात्रीच्या सुमारास घरात शिरलेला कोब्रा जातीचा विषारी साप पकडण्यासाठी गेलेल्या एका सर्पमित्रालाच सर्पदंशाला सामोरं जावं लागलं. या सर्पमित्राला अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी शहरातील शासकीय रुग्णालयासह अनेक खासगी रुग्णालयांची फरफट करावी लागली. मध्यरात्री तब्बल तासभर ही फरफट सुरू होती. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर सर्पमित्राला उपचार मिळाले आणि त्याचा जीव वाचला. सर्पमित्राला वेळीच उपचार मिळाले नसते तर त्याचा जीव गमविण्याची वेळ आली असती, अश्या संतप्त भावना सहकारी सर्पमित्रांनी व्यक्त केल्या आहेत. ( Snake Catcher Bitten By Cobra )

वाचा: ठाण्यातील करोनामृत्यू आणि बाधितांचा ‘हा’ आकडा झोप उडवणारा!

गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव शहरातील खंडेराव नगरातील एका घरात साप शिरल्याची माहिती सर्पमित्र रवींद्र भोई यांना त्यांच्या मोबाइलवरुन देण्यात आली. त्यानुसार भोई आपल्या विक्की नामक सहकाऱ्याला सोबत घेऊन खंडेराव नगरात पोहचले. काही जण आधीच सापाचा शोध घेत होते. वर्णन विचारले असता तो कोब्रा जातीचा असल्याचे स्पष्ट झाले. कोब्रा दिसल्यानंतर त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो घराच्या छताच्या पत्र्याच्या आत लपला. म्हणून काही तरुण घराच्या छतावर चढले. इकडे रवींद्र भोई घरातील लोकांना बाहेर काढत होते. सर्वजण घराबाहेर पडल्यानंतर भोई यांनी शोधकार्य सुरू केले.

दंशानंतरही आधी कोब्राला अधिवासात सोडले

भोई घरात कोब्राचा शोध घेत असतानाच अचानक कोब्रा भोई यांच्या अंगावर पडला. या प्रकाराने भोई गोंधळले. त्यातच कोब्राने त्यांच्या हाताच्या अंगठ्याला दंश केला. दंश केल्यानंतरही भोई यांनी त्याला सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर सहकारी विक्कीच्या मदतीने त्यांनी त्याला जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडले. या दरम्यान, भोई यांनी ‘आपण वाचणारच’ ही जिद्द मनात कायम ठेवत प्रथमोपचार सुरू ठेवले आणि सहकारी सर्पमित्र जगदीश बैरागी यांना घटना कळवली.

वाचा: खासदार जलील यांची गंभीर तक्रार; मुख्यमंत्र्यांची तिथेच कारवाई!

अत्यवस्थ स्थितीत उपचारासाठी फरफट

जगदीश बैरागी यांनी रवींद्र भोई यांना तात्काळ उपचारासाठी सोबत घेत वन्यजीव संरक्षक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक, बालकृष्ण देवरे, ऋषी राजपूत, निलेश ढाके यांना घटना कळवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रवींद्र फालक यांनी अवघ्या पाच मिनिटांत शासकीय हॉस्पिटल गाठले. तेथे फक्त करोना रुग्णांवर उपचार होतात, असे सांगत त्यांना गेटवरूनच परत पाठविण्यात आले. त्यानंतर सर्वजण भोई यांना घेऊन शाहू महाराज रुग्णालयात पोहचले. तिथे फक्त एक रखवालदार होता. उपचार होणार नाही, असे उत्तर मिळाल्यावर त्यांनी शहरातील अश्विनी हॉस्पिटल गाठले. ते देखील बंद होते. डॉक्टरांनी येण्याची तयारी दर्शविली पण परिस्थिती बघता तितका वेळ नसल्याने दुसऱ्या खासगी रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला. पण तिथे देखील गेटवरच नकार मिळाला. आयसीयूमध्ये बेडच शिल्लक नाही, असे सांगण्यात आले. त्यात अजून वेळ गेला. इकडे सर्पदंश होऊन तासभर झाल्यामुळे शरिरावर विषाचा प्रभाव दिसू लागला होता. भोई यांना मळमळ, चक्कर यायला सुरुवात झाली होती. त्यामुळे सगळेच चिंतेत होते. तितक्यात फालक यांचा कॉल आला. सिव्हिल हॉस्पिटलला व्यवस्था झाली आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर पुढील पंधरा मिनिटांत सिव्हिलमध्ये भोई यांना दाखल करण्यात आले. तिथे डॉ. दत्तात्रय बिराजदार आणि डॉ. विजय गायकवाड यांच्याशी बोलणं झाल्यावर पाच मिनिटांनी उपचार सुरू झाले. ठराविक वेळेत नर्स, डॉक्टरांची व्हिजिट होत राहिली. पहाटे चारपर्यंत भोई पूर्वस्थितीत येण्यास सुरुवात झाली. अन्‌ सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. भोई यांना पुढील उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

वाचा: महापौरांनीच दिले करोना रुग्णांना योगाचे धडे

…तर काय झाले असते?

या घटनेमुळे शहरातील आरोग्य यंत्रणेच्या ढासळलेल्या परिस्थितीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. करोनालाच इतके महत्त्व दिले तर पावसाळ्यात सर्पदंश झाल्यास अशा व्यक्तीने कुठे जायचे?, याचा विचार रुग्णालय प्रशासनाने करायला हवा. करोना काळात सर्पदंशाचा मृत्यूदर वाढल्यास त्याला जबाबदार कोण राहील? सर्प दंश झाल्यावर शासकीय उपचारासाठी नेमके कुठे गेले पाहिजे, हे प्रशासनाने जाहीर करावे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य बाळकृष्ण देवरे यांनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे, विषारी सर्पदंश झाल्यानंतर पहिला तास खूप महत्त्वपूर्ण असतो. त्याला वैद्यकीय भाषेत ‘गोल्डन अवर’ म्हणतात. त्या दरम्यान योग्य उपचार मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता नगण्य असते. नेमका उपचार कुठे होईल, हेच शोधण्यात वेळ जात असेल तर रुग्ण वाचणार कसे, असा प्रश्न वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक यांनी उपस्थित केला आहे.

वाचा: केंद्रीय पथक जळगावात; करोनासंबंधी दिले ‘हे’ निर्देशSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

raju shetti on farmers republic day parade: दिल्लीत शेतकरी संचलनात घातपाताची शक्यता; ‘या’ नेत्याने व्यक्त केली भीती – raju shetti expressed his fear about...

सांगली: सांगलीतून निघालेला ट्रॅक्टर मोर्चा कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी गंभीर विधान केले...

colonel santosh babu: गलवान खोऱ्यात चिन्यांवर तुटून पडलेल्या कर्नल संतोष बाबूंना महावीर चक्र – gallantry awards galwan valley martyrs colonel santosh babu honoured with...

नवी दिल्लीः पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात ( galwan valley martyrs ) चिनी सैनिकांना अद्दल शिकवताना शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू ( colonel santosh...

Recent Comments