Home शहरं कोल्हापूर collector office kolhapur: इतनी शक्ती हमें देना दाता... 'हे' सरकारी कार्याल आहे...

collector office kolhapur: इतनी शक्ती हमें देना दाता… ‘हे’ सरकारी कार्याल आहे खास! – prayer and meditation in government office


कोल्हापूर: रोज सकाळी कार्यालय सुरू होताच ते सगळे परिघाप्रमाणे उभे राहतात… सर्वांचे हात जोडले जातात… लॅपटॉपवरील प्रार्थनेबरोबर खड्या आवाजात ‘इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमजोर हो ना’ प्रार्थनेला सुरुवात होते… प्रार्थना झाल्यानंतर ध्यानधारणा ओमकार स्वराने…आणि हितगुजाने शेवट… हे दृष्य कोणत्याही शाळेतील नाही. हे चित्र आहे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी यांच्या कार्यालयातील.

नव्या मुख्य सचिवांनी स्वीकारला पदभार; ‘ही’ आहेत सर्वात मोठी आव्हाने

बहुतेक सर्वच कार्यालयात सकाळी आल्यानंतर कामाची लगबग सुरू होते. जो तो आपल्या कामात मग्न होतो. पण या कामाची सुरुवात चांगल्या वातावरणात होणे आवश्यक आहे. म्हणून रोजगार हमी कार्यालयात रोज सकाळी प्रार्थना घेण्याचा चांगला उपक्रम सुरू केला. याशिवाय कार्यालयातील प्रत्येकजण ताण-तणाव मुक्त राहण्यासाठी ‘ हितगुज ’ हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये जिल्ह्यातील एखादा अधिकारी हितगुजासाठी बोलविला जातो. बालपणापासून हरवत गेलेलं हितगुज या निमित्ताने होत जातं. या हितगुजामधून एक नवी ऊर्जा मिळून जाते. त्यामुळे मनाला उभारी तर मिळतेच शिवाय प्रसन्न मनाने कार्यक्षमता वाढते.

मुलगा झाल्याचा आनंद त्यांनी ‘असा’ साजरा केला; संपूर्ण तालुक्यात चर्चा

आतापर्यंत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह उपजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, हेमंत निकम, दत्तात्रय कवितके, उपसंचालक भाग्यश्री फरांदे, खनिकर्म अधिकारी अमोल थोरात, तहसिलदार शिल्पा ठोकडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, लेखाधिकारी प्रशांत जाधव, डॉ. गोपाळ आयरोणी, पत्रकार अतुल जोशी आदी हितगुज करण्यासाठी सहभागी झाले आहेत. या हितगुजामुळे गेल्या दोन महिन्यात आमच्या स्वभावात सकारात्मक बदल झाला आहे. लवकर उठणे, योग साधना, वाचन करत असल्याची भावना या कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

लॉकडाऊनचा ‘खेळ’; तमाशा लोककलाकारांवर उपासमारीची वेळSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

child labor work for road in vaijapur: रस्त्याच्या कामावर बालमजूर जुपंले? – child laborers working on the road from dhondalgaon to rahegaon

म. टा. प्रतिनिधी, वैजापूरसार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू असलेल्या धोंदलगाव ते राहेगाव या रस्त्याच्या कामावर बालमजूर काम करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र,...

Rohit Sharma: IND vs AUS : रोहित शर्मा बाद झाल्यावर सुनील गावस्कर यांनी टोचले कान, म्हणाले… – ind vs aus : indian former captain...

ब्रिस्बेन, IND vs AUS : सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा हा चांगल्या लयीत फलंदाजी करत होता. पण यावेळी एक मोठा फटका...

ZP schools: वीजजोडणी कापल्याने १० हजारांवर जिल्हा परिषद शाळा अंधारात – over 10 thousand z p schools are in dark as electricity supply disconnected

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईवीज बिल भरले नाही म्हणून राज्यातील सुमारे १० हजार ६७१ जिल्हा परिषद शाळांची वीजजोडणी कापण्यात आली आहे. यामुळे २७...

cheapest 5g mobile moto g 5g price: गुड न्यूज! सर्वात स्वस्त ५जी मोबाइल Moto G 5G च्या किंमतीत मोठी कपात – cheapest 5g mobile...

नवी दिल्लीः स्वस्त किंमतीतील ५ जी स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील सर्वात स्वस्त ५ जी मोबाइल Motorola Moto G...

Recent Comments