महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर राहणाऱ्या मराठी भाषिकांसाठी मराठी माध्यमाचं कॉलेज सुरू करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पावलं उचलली आहेत. या भागात मराठी महाविद्यालय सुरू करता येईल का यासंदर्भातील चाचपणीसाठी महाराष्ट्र सरकारने एका समितीची स्थापना केली आहे.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर या समितीचे अध्यक्ष आहेत. हे कॉलेज कशा पद्धतीने उभारलं जाईल, कोणकोणते अभ्यासक्रम असतील आदी सर्व मुद्द्यांवर ही सहा सदस्यीय समिती काम करणार आहे. कर्नाटक सीमेवर मराठी भाषिक मोठ्या संख्येने राहतात.