Home क्रीडा Commonwealth Games 2022 One Day Delay - करोना व्हायरसचा असाही परिणाम; फटका...

Commonwealth Games 2022 One Day Delay – करोना व्हायरसचा असाही परिणाम; फटका २०२२पर्यंत बसणार!


नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसात खेळ पुन्हा सुरू झाला असला तरी अद्याप महत्त्वाच्या आणि मोठ्या स्पर्धा पुढे ढकरण्यात आल्या आहेत. यात ऑलिम्पिकचा देखील समावेश आहे. २०२०चे क्रीडा वेळापत्रक बिघडल्याने त्याचा परिणाम २०२१ आणि २०२२ साली होताना दिसत आहे.

लंडनमधील बर्मिंघम येथे २०२२ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धा नियोजित वेळापत्रकापेक्षा एक दिवस उशीरा सुरू होणार आहेत. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेनंतर खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळावी, तसेच युरोपियन महिला फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या तारखा टाळता याव्यात, यासाठी राष्ट्रकुल स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

वाचा- आम्ही बळीचा बकरा होण्यासाठी नाही आलो; कर्णधाराने सुनावले!

या बदलांना राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने (सीजीएफ) मान्यता दिली असून नव्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा आता २८ जुलै ते ८ ऑगस्ट, २०२२ दरम्यान होणार आहे. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धा १५ ते २४ जुलै, २०२२ दरम्यान होणार असून युरोपियन महिला फुटबॉल स्पर्धा ६ ते ३१ जुलैदरम्यान होणार आहे. या दोन्ही स्पर्धा अगोदर २०२१ मध्ये होणार होत्या. तथापि, करोना व्हायरसमुळे टोकियो ऑलिम्पिक २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धा २०२२ मध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

वाचा- IPL संदर्भात बीसीसीआयची मोठी घोषणा

हा बदल जरी एका दिवसाचा असला, तरी त्यानुसार राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये खेळवण्यात येणाऱ्या १९ क्रीडाप्रकारांच्या वेळापत्रकामध्ये होणाऱ्या बदलांवर आम्ही काम करत आहोत, असे बर्मिंघम २०२२ आयोजन समितीचे अध्यक्ष जॉन क्रॅबट्री यांनी सांगितले.

हे देखील वाचा-
>> सॅमीला पाकिस्तानमध्ये राजासारखी वागणूक मिळते, झाला मोठा खुलासा
>>
आयपीएलला शाहरुखच्या संघाने आणलं अडचणीत, ठेवल्या तीन अटी
>> करोनाचा भारतीय क्रिकेटला मोठा धक्का, रद्द करावा लागला दौराSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sujay vikhe patil: ‘शरद पवारांवर विश्वास ठेवायचा की मोदींवर? हे जनतेनेच ठरवावे’ – bjp mp sujay vikhe clears stand on k k range issue

अहमदनगर: ‘के के रेंज प्रश्नासंदर्भात आम्ही जी भूमिका तत्कालीन दौऱ्यात मांडली त्यावर आजही ठाम आहोत. त्या भूमिकेत कोणताही बदल नाही. त्यामुळे आता शरद...

sujay vikhe patil: ‘मी भाजपमध्ये नवीन आहे; खडसेंबद्दल काय बोलणार?’ – how can i comment on eknath khadse, says bjp mp sujay vikhe patil

अहमदनगर: 'भारतीय जनता पक्षात मी नवीन आहे. मला एकच वर्ष झालं आहे. त्यामुळं ४० वर्षे पक्षात असलेल्या व्यक्तीवर मी टीकाटिप्पणी काय करणार,' अशी...

Recent Comments